मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asia Cup 2022: फायनलमध्ये पराभव, विराटची पाकिस्तानी फॅन ढसाढसा रडली, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2022: फायनलमध्ये पराभव, विराटची पाकिस्तानी फॅन ढसाढसा रडली, पाहा व्हिडिओ

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 12, 2022 01:12 PM IST

Virat Kohli Beautiful pakistani girl Fan: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव झाला. यानंतर पाकिस्तानचे चाहते खूपच निराश झाले आहेत. या सगळ्यात एका पाकिस्तानी मुलीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जी सामना संपल्यानंतर स्टेडियमध्ये रडताना दिसत आहे.

Asia Cup 2022
Asia Cup 2022

आशिया चषक टी-२० स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (११ सप्टेबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना जिंकत श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी धुव्वा उडवला.

पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते खूपच निराश दिसले. पण या सगळ्या गर्दीत एका चाहतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पाकिस्तानची ही तरुणी आशिया चषकादरम्यानच प्रकाश झोतात आली आहे. ती विराट कोहलीची देखील कट्टर फॅन आहे.

इंस्टाग्रामवर 'लव्ह खानी' या नावाने या सुंदर तरुणीचे अकाऊंट आहे. आशिया कप दरम्यान प्रकाशझोतात आल्यानंतर या मुलीच्या फॉलोअर्सच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर ही फॅन गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दरम्यान, अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून पाकिस्तानचा पराभव झाला. त्यानंतर या तरुणीचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जर पाकिस्तान जिंकू शकत नसेल तर भारताने जिंकायला हवे होते. असे ती या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. तसेच, या व्हिडिओमध्ये ही चाहती दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये असलेल्या श्रीलंकेच्या चाहत्यांचे अभिनंदन करताना दिसत आहे. मात्र अभिनंदन करताना तिच्या डोळ्यात अश्रू आहेत.

अंतिम सामन्यात श्रीलंकन खेळाडूंची शानदार कामगिरी

अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा केल्या होत्या. भानुका राजपक्षेने सर्वाधिक ७१ आणि वनिंदू हसरंगाने ३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ १४७ धावाच करू शकला. मोहम्मद रिझवानने ५५ आणि इप्तीखार अहमदने ३२ धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशनने ४ आणि वनिंदू हसरंगाने ३ बळी घेतले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या