मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Team India Schedule : फेब्रुवारीत टीम इंडियाला केवळ इतके दिवस ब्रेक, या महिन्याचं संपूर्ण वेळापत्रक

Team India Schedule : फेब्रुवारीत टीम इंडियाला केवळ इतके दिवस ब्रेक, या महिन्याचं संपूर्ण वेळापत्रक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 01, 2023 12:20 PM IST

team india february schedule : फेब्रुवारी महिनाही टीम इंडियासाठी आव्हानात्मक असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे, या महिन्यात दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. सोबतच, दुसरीकडे महिला संघाला टी-20 विश्वचषक खेळायचा आहे.

team india february schedule
team india february schedule

border gavaskar trophy 2023 schedule : या वर्षीचा नवीन महिना सुरू झाला आहे आणि यासोबतच टीम इंडियाच्या नव्या मिशनचीही सुरुवात होणार आहे. भारतीय खेळाडू काही काळापासून सतत क्रिकेट खेळत आहेत आणि हा ट्रेंड या महिन्यातही कायम राहणार आहे. फेब्रुवारीमध्ये टीम इंडियासमोर अनेक मोठे आव्हाने असणार आहेत, ज्यात न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना, ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका यांचा समावेश आहे.

केवळ पुरुष संघच नाही तर महिला संघाचीही या महिन्यात खडतर परिक्षा असणार आहे. कारण महिला टी-२० विश्वचषक १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अलीकडेच अंडर-१९ महिला संघाने टी-20 विश्वचषक जिंकला आहे, अशा परिस्थितीत चाहत्यांच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत.

फेब्रुवारीमध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांना अनेक रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत.

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक (फेब्रुवारी)

१ फेब्रुवारी – T20 विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद

९ ते १३ फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी, नागपूर

१७ ते २१ फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरी कसोटी, दिल्ली

भारतीय महिला क्रिकेट संघाचे वेळापत्रक (फेब्रुवारी)

२ फेब्रुवारी - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, त्रिकोणी मालिका

६ फेब्रुवारी - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सराव सामना

८ फेब्रुवारी - भारत विरुद्ध बांगलादेश, सराव सामना

१२ फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान, T20 विश्वचषक

१५ फेब्रुवारी - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, T20 विश्वचषक

१८ फेब्रुवारी - भारत विरुद्ध इंग्लंड, T20 विश्वचषक

२० फेब्रुवारी - भारत विरुद्ध आयर्लंड, T20 विश्वचषक

जर टीम इंडिया पुढील फेरीसाठी पात्र ठरली

२३ फेब्रुवारी - पहिला सेमी फायनल, T20 विश्वचषक

२४ फेब्रुवारी - दुसरा सेमी फायनल, T20 विश्वचषक

२६ फेब्रुवारी - फायनल , T20 विश्वचषक

WhatsApp channel

संबंधित बातम्या