मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rahul Dravid: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर द्रविड अ‍ॅक्शन मोडवर, BCCI ला केली स्पेशल विनंती

Rahul Dravid: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर द्रविड अ‍ॅक्शन मोडवर, BCCI ला केली स्पेशल विनंती

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 21, 2022 02:40 PM IST

टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने BCCI ला एक स्पेशल विनंती केली आहे. द्रविडने बीसीसीआयला टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियात आणखी सराव सामने आयोजित करण्याची विनंती केली आहे. भारतीय संघ ९ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला जाणार होता.

Rahul Dravid
Rahul Dravid

मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने दिलेले २०९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावून पूर्ण केले. ३ सामन्यांच्या T20I मालिकेत भारत आता ०-१ ने पिछाडीवर आहे.

यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी संघ लवकर पाठवण्याची विनंती केली आहे. सोबतच, द्रविडने बीसीसीआयला टीम इंडियासाठी आणखी सराव सामने आयोजित करण्याची विनंती केली आहे. यापूर्वी भारतीय संघ ९ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला जाणार होता. मात्र द्रविडच्या विनंतीनंतर आता ५ ऑक्टोबरला संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची शक्यता आहे.

एका रिपोर्टनुसार, भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आणखी २-३ सराव सामने खेळणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितले की, “आम्ही काही संघांशी चर्चा करत आहोत, जे आयसीसीने आयोजित केलेल्या सराव सामन्यांव्यतिरिक्त आमच्यासोबत सामने खेळतील. द्रविड आणि त्याच्या सपोर्ट स्टाफसह T20 वर्ल्डकपचा ​​संपूर्ण संघ ५ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.

विशेष म्हणजे, बीसीसीआयने राहुल द्रविडचे आवाहन स्वीकारल्यास भारतीय संघ ४ ऑक्टोबरला इंदूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा T20 सामना खेळल्यानंतर लगेच निघेल.

BCCI आणि आयसीसीने आयोजित केलेल्या दोन सामन्यांव्यतिरिक्त न्यूझीलंड (१७ ऑक्टोबर) आणि ऑस्ट्रेलिया (१८ ऑक्टोबर) विरुद्ध किमान तीन सराव सामन्यांचे नियोजन करत आहे. भारताला ऑस्ट्रेलियात दोन सराव सामने खेळायचे आहेत. T20 विश्वचषक २०२२ चा सुपर १२ फेरी सुरू होण्यापूर्वी भारत ब्रिस्बेनमधील गाबा येथे अनुक्रमे १७ ऑक्टोबर आणि १९ ऑक्टोबर रोजी यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसोबत सराव सामना खेळेल.

विश्वचषकात भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या