मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sunil Chhetri viral video: फोटोसाठी राज्यपालांनी केला सुनील छेत्रीचा अपमान, चाहते संतापले

Sunil Chhetri viral video: फोटोसाठी राज्यपालांनी केला सुनील छेत्रीचा अपमान, चाहते संतापले

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 19, 2022 01:49 PM IST

Sunil Chhetri and L Ganesan viral video: ड्युरंड कपच्या अंतिम सामन्यात बेंगळुरू एफसीने विजय मिळवला. सामना संपल्यानंतर जेव्हा ट्रॉफीचे प्रदान करण्यात आली, तेव्हाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो सेशन दरम्यान बंगालचे राज्यपाल सुनील छेत्रीला मागे ढकलताना दिसत आहेत. या प्रसंगामुळे चाहते संतापले आहेत.

Sunil Chhetri
Sunil Chhetri

कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर रविवारी ड्युरंड कपचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात बेंगळुरू एफसीने मुंबई सिटी एफसीचा २-१ असा पराभव करून ड्युरंड कप जिंकला. पण या सामन्यापेक्षाही जास्त चर्चा रंगली, ती प्रेझेंटेशन सोहळ्यादरम्यानच्या एका प्रसंगाची आहे. या प्रसंगाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे

सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन सोहळ्यात बेंगळुरू एफसीचा कर्णधार सुनील छेत्री मंचावर उपस्थित असल्याचे दिसत आहे. यावेळी विजेता कर्णधार सुनील छेत्रीला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यानंतर फोटो सेशन झाले, या फोटोसेशन वेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल एल. गणेशन फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. यावेळी गणेशन यांनी छेत्रीला थोडे मागे ढकलल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, या घटनेमुळे चाहतेही प्रचंड संतापले आहेत.

अनेक सेलिब्रेटीही संतापले

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. केवळ चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने व्हिडिओवर टिप्पणी करताना लिहिले की, हे लज्जास्पद आहे.

काही चाहत्यांनी हे कसले वर्तन आहे असे लिहिले, तर "सुनील छेत्री एक खेळाडू आहे. खेळाडूचा आदर करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी सुनील छेत्री आणि भारतीय फुटबॉलची माफी मागावी, असेही काही चाहत्यांनी सांगितले.

दरम्यान, फायनल सामन्यात बेंगळुरूने मुंबईचा २-१ असा पराभव केला. बेंगळुरुकडून शिवशक्ती आणि अॅलन कोस्टाने एक-एक गोल केला.

WhatsApp channel

संबंधित बातम्या