मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill Double Century : शुभमन गिलचं द्विशतक, सलग ३ षटकार ठोकत गाठला २०० धावांचा आकडा

Shubman Gill Double Century : शुभमन गिलचं द्विशतक, सलग ३ षटकार ठोकत गाठला २०० धावांचा आकडा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 18, 2023 05:15 PM IST

shubman gill double century, India Vs New Zealand Today ODI Match : भारताचा सलामीवीर शुभमन गिलने द्विशतक झळकावले आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात ही खेळी साकारली. गिलने १४४ चेंडूत २०० धावा ठोकल्या आहेत.

shubman gill century
shubman gill century

India Vs New Zealand Today ODI Match scorecard : भारताचा सलामीवीर शुभमन गिलने द्विशतक झळकावले आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात ही खेळी साकारली. गिलने १४४ चेंडूत २०० धावा ठोकल्या आहेत.

शुभमन गिलने १९व्या वनडे डावात द्विशतक झळकावले. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर लागोपाठ तीन षटकार मारून त्याने २०० धावांचा टप्पा गाठला. वनडेत द्विशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज आहे.

शुभमनने त्याच्या खेळीत १९ चौकार आणि ९ षटकार मारले. तो शेवटच्या षटकात २०८ धावा करून बाद झाला. त्याने १४९ चेंडूंचा सामना केला. शेवटच्या षटकात षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. शिप्लेच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्सने त्याचा झेल पकडला.

शुभमन गिलच्या या द्विशतकाच्या बळावरच भारताने निर्धारित ५० षटकात ३४९ धावांचा डोंगर उभारला आहे. न्यूझीलंडला विजयासाठी ३५० धावा कराव्या लागणार आहेत.

भारतासाठी द्विशतक झळकावणारे खेळाडू

फलंदाजधावाविरूद्धवर्ष
रोहित शर्मा२६४श्रीलंका२०१४
विरेंद्र सेहवाग२१९वेस्ट इंडिज२०११
इशान किशन२१०बांगलादेश२०२२
रोहित शर्मा२०९ऑस्ट्रेलिया२०१३
रोहित शर्मा२०८*श्रीलंका२०१७
शुभमन गिल२०८*न्यूझीलंड२०२३
सचिन तेंडुलकर२००*दक्षिण आफ्रिका२०१०

भारताचा डाव

तत्पूर्वी, भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. रोहित-शुभमन जोडीने पावरप्लेचा चांगला फायदा घेतला. दोघांनी वेगाने धावा केल्या. मात्र, त्यानंतर भारताची पहिली विकेट ६० धावांवर पडली. कर्णधार रोहित शर्मा ३८ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला आहे. ब्लेअर टिकनरने त्याला मिचेल सँटनरकरवी झेलबाद केले. रोहितने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार मारले. 

त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला आणि इशान किशनला खास काही करता आले नाही. दोघेही स्वस्ता तंबूत परतले. विराटने ८ तर इशान किशनने अवघ्या ५ धावा केल्या. इशान किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवसह शुभमन गिलने भारतीय डाव सांभाळला. दोघांनी अर्धशतकीय भागिदारी केली.

त्यानंतर १७५ धावांवर भारताची चौथी विकेट पडली. सूर्यकुमार यादव २६ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. डेरिल मिचेलने त्याला मिचेल सँटनरकरवी झेलबाद केले. त्यानंतर शुभमन गिलने डावाची सुत्रे हाती घेतली आणि द्विशतक ठोकत संघाला ३०० धावांच्या पुढे नेले. 

WhatsApp channel