मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill Century : अहमदाबादेत शुभमन गिलचा धमाका, ठोकलं टी-20 करिअरचं पहिलं शतक

Shubman Gill Century : अहमदाबादेत शुभमन गिलचा धमाका, ठोकलं टी-20 करिअरचं पहिलं शतक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 01, 2023 08:35 PM IST

shubman gill 1st t20 century vs new zeland : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक T20 सामना आज बुधवारी (१ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताने न्यूझीलंडसमोर २३५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

shubman gill 1st t20 century
shubman gill 1st t20 century

India vs New zeland 3rd T20 match : कसोटी आणि वनडेनंतर शुभमन गिलने आता टी-20 मध्येही शतक पूर्ण केले आहे. अहमदाबादमध्ये गिलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने आपल्या T20 कारकिर्दीतील पहिल्या अर्धशतकाचे रूपांतर पहिल्या शतकात केले. गिलने १८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. त्याने ५४ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात नाबाद १२६ धावा केल्या. त्याच्या ६३ चेंडूंच्या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकार मारले.

शुभमन गिलने ५४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तर त्याआधी त्याने ३५ चेंडूत आुपले अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र, त्यानंतरच्या ५० धावा गिलने अवघ्या १९ चेंडूत ठोकल्या. 

शुभमन गिलच्या या शतकाच्या बळावरच भारताने न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. भारताने २० षटकात ४ गडी गमावून २३४ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडला विजयासाठी २३५ धावा करायच्या आहेत. टीम इंडियाकडून शुभमन गिलने सर्वाधिक नाबाद १२६ धावा केल्या. त्याने ६३ चेंडूंत १२ चौकार आणि ७ षटकार मारले. गिलचे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनंतर आता T20 मध्येही शतक पूर्ण झाले आहे.

शुभमन तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा खेळाडू

या शतकानंतर शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत तो पाचवा भारतीय ठरला. शुभमन गिलच्या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके ठोकली आहेत. इतकंच नाही तर शुभमन गिल टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. 

शुभमन गिलने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीने ८ सप्टेंबर २०२२ रोजी अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद १२२ धावांची खेळी खेळली होती.

WhatsApp channel