मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Viral Video: काश्मीरच्या रस्त्यांवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची तुफान फटकेबाजी! व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video: काश्मीरच्या रस्त्यांवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची तुफान फटकेबाजी! व्हिडीओ होतोय व्हायरल

Feb 22, 2024 03:44 PM IST

Sachin Tendulkar Viral Video: गुलमर्गच्या नयनरम्य वातावरणात सचिनने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. रस्त्याच्या कडेला क्रिकेट खेळतानाही सचिन तेंडुलकरने आपला दमदार खेळ दाखवला.

Sachin Tendulkar Viral Video
Sachin Tendulkar Viral Video

Sachin Tendulkar Viral Video: भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासह सध्या काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी सचिन तेंडुलकर याने गुलमर्गच्या खोऱ्यांमध्ये स्थानिकांसोबत रस्त्यावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. 'क्रिकेटचा देव' म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही यावेळी अमन सेतू पुलाला भेट दिली. याशिवाय जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एलओसीला देखील त्याने भेट दिली. यावेळी अमन सेतूसमोरील कमांड पोस्टवर सचिनने बराच वेळ सैनिकांशी संवादही साधला.

गुलमर्गच्या नयनरम्य वातावरणात सचिनने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. रस्त्याच्या कडेला क्रिकेट खेळतानाही सचिन तेंडुलकरने आपला दमदार खेळ दाखवला. सचिन तेंडुलकर याने स्थानिक लोकांसोबत गप्पा मारतानाचा आणि क्रिकेटच्या खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर स्थानिकांसोबत काही फोटोही क्लिक करताना दिसला आहे. हातात उलटी बॅट धरून त्याने गोलंदाजाला शेवटच्या चेंडूवर बाद करण्याचे आव्हान देखील दिले. मात्र, शेवटच्या चेंडूवर बॅटच्या हँडलने खेळणाऱ्या सचिनला बाद करण्यात गोलंदाज अपयशी ठरला. ‘क्रिकेट आणि काश्मीर: स्वर्गातील एक सामना!’ असे कॅप्शन देत सचिन तेंडुलकरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Ashwath Kaushik Chess : ८ वर्षांच्या अश्वथ कौशिकने इतिहास रचला, पाच पट मोठ्या बुद्धीबळ ग्रँडमास्टरला हरवलं

सचिन सहकुटुंब काश्मीर दौऱ्यावर!

या काश्मीर दौऱ्यादरम्यान सचिन तेंडुलकरने अमन सेतू पुलाला भेट दिली. एक तास चाललेल्या या भेटीदरम्यान तेंडुलकरने अमन सेतूजवळील कमन पोस्टवर सैनिकांशी संवाद साधला. उरीमध्ये त्यांनी काही मुलांसोबत रस्त्याच्या कडेला थांबून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी स्थानिक मुलांनी त्याच्या खेळाचे अगदी जवळून निरीक्षण केले. सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली आणि मुलगी सारासोबत गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. या दरम्यान त्याने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील चुरसू येथील क्रिकेट बॅट कारखान्याला भेट दिली.

ट्रेंडिंग न्यूज

आठवणींना दिला उजाळा

सचिन तेंडुलकर याला त्याची बहीण सविता हिने काश्मीर विलोपासून बनवलेली पहिली बॅट दिली होती. यावेळी सचिनने या आठवणींना उजाळा दिला. याशिवाय सचिनने काश्मीर विमान प्रवास करतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, सचिन विमानात बसलेला असताना, त्याच्या सहप्रवाशांनी टाळ्या वाजवत ‘सचिन सचिन’ असा जयघोष देखील केला. आपल्याला मिळणारे प्रेम पाहून सचिन तेंडुलकर भावूक झालेला पाहायला मिळाला.

WhatsApp channel