मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: सूर्याने दोन सोप्या कॅच सोडल्या, त्यानंतर रोहित शर्माने...; हिटमॅनची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Rohit Sharma: सूर्याने दोन सोप्या कॅच सोडल्या, त्यानंतर रोहित शर्माने...; हिटमॅनची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 12, 2023 12:42 PM IST

Rohit Sharma On Suryakumar Yadav: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने दोन सोपे झेल सोडल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.

Suryakumar Yadav, Rohit Sharma
Suryakumar Yadav, Rohit Sharma

Rohit Sharma's Reaction After Suryakumar Yadav Drops Two Catches: आयपीएल २०२३ च्या सोळाव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने अनपेक्षित कामिगिरी केली. या सामन्यात गोल्डन डकचा शिकार ठरलेल्या सूर्यकुमार यादवने क्षेत्ररक्षणादरम्यानही दोन झेल सोडले. यावर रोहित शर्माने दिलेली रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सूर्या क्षेत्ररक्षणात पूर्णपणे अपयशी ठरला. दिल्लीच्या डावातील १५ व्या षटकात सूर्यकुमार यादवने फटकेबाजी करणाऱ्या अक्षर पटेलचा झेल सोडला. एवढेच नव्हेतर, दिल्लीच्या डावातील १७व्या षटकातही सूर्याने पुन्हा अशीच चूक केली आणि अक्षरचा झेल सोडला. सूर्याने झेल सोडल्यानंतर रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली. रोहितची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली.

भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवची बॅट गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे शांत आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तो सातत्याने फ्लॉप ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील खराब फॉर्मनंतर आयपीएल २०२३ मध्येही त्याची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. दरम्यान, मंगळवारी खेळण्यात आलेल्या दिल्लीविरुद्ध सामन्यात तो गोल्डन डकचा शिकार ठरला. मुकेश कुमारने पहिल्या चेंडूवर त्याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. पहिल्याच चेंडूवर आऊट होण्याची ही त्याची सातवी वेळ आहे.

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत १२६ आयपीएल सामने खेळले आहेत. यातील १११ डावात फलंदाजी करताना त्याने २९.२३ च्या सरासरीने २ हजार ६६० धावा केल्या आहेत. ज्यात १६ अर्धशकांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादव हा मॅच विनिंग प्लेअर आहे. यामुळे त्याचे फॉर्ममध्ये परतणे मुंबईच्या संघासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. मुंबईच्या अनेक विजयात सूर्यकुमार यादवने मोलाचा वाटा उचलला आहे.

WhatsApp channel

विभाग