मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant- BCCI: बीसीसीआयनं केला ऋषभ पंतचा खास सन्मान, फक्त 'या' दोन खेळाडूंची झाली निवड

Rishabh Pant- BCCI: बीसीसीआयनं केला ऋषभ पंतचा खास सन्मान, फक्त 'या' दोन खेळाडूंची झाली निवड

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 31, 2022 03:36 PM IST

BCCI player of the year Rishabh Pant & Jasprit Bumrah: BCCI ने यावर्षीच्या कसोटीमधील आपल्या दोन सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये फलंदाजीत ऋषभ पंत आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराह यांची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने या दोघांची २०२२ सालातील सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू म्हणून निवड केली आहे.

BCCI player of the year Rishabh Pant & Jasprit Bumrah
BCCI player of the year Rishabh Pant & Jasprit Bumrah

Rishabh Pant Car accident new update: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतसोबत शुक्रवारी (३० डिसेंबर) पहाटे मोठा अपघात झाला. रुरकीजवळ त्याची भरधाव कार दुभाजकाला धडकली. पंत स्वतः कार चालवत होता. सध्या ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या अनेक तपासण्याही झाल्या आहेत.

पंत याच्यावर काही शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याच्या डोक्याला, पायाला, गुडघ्याला, घोट्याला आणि पाठीला दुखापत झाली. सध्या त्याची प्रकृती ठीक आहे. पण दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऋषभ पंतला सन्मान दिला आहे. बीसीसीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

पंत आणि बुमराह सर्वात्त कसोटी क्रिकेटर

वास्तविक, आज (३१ डिसेंबर) वर्ष २०२२ चा शेवटचा दिवस आहे. यादिवशी BCCI ने यावर्षीच्या कसोटीमधील आपल्या दोन सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये फलंदाजीत ऋषभ पंत आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराह यांची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने या दोघांची २०२२ सालातील सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू म्हणून निवड केली आहे.

बीसीसीआयने त्यांच्या ट्विटमध्ये ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांचे फोटोही शेअर केले आहेत. तसेच या खेळाडूंचे २०२२ चे आकडे देखील शेअर केले आहेत. पंतने २०२२ मध्ये ७ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने १२ डावात ६८० धावा केल्या. पंत या वर्षी सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. यादरम्यान त्याची सरासरी ६१.८१ इतकी आहे.

पंतने या दरम्यान २ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय बीसीसीआयने बुमराहची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू म्हणून निवड केली आहे. या वेगवान गोलंदाजाने या वर्षी ५ कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने १० डावात सर्वाधिक २२ बळी घेतले आहेत.

२०२२ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारे भारतीय फलंदाज

ऋषभ पंत - १२ कसोटी डाव - ६८० धावा - २ शतके

श्रेयस अय्यर - ८ कसोटी डाव - ४२२ धावा - ० शतके

चेतेश्वर पुजारा - १० कसोटी डाव - ४०९ धावा - १ शतक

२०२२ मध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणारे भारतीय गोलंदाज

जसप्रीत बुमराह - ५ कसोटी सामने - २२ विकेट

रविचंद्रन अश्विन - ६ कसोटी सामने - २० विकेट

मोहम्मद शमी - ५ कसोटी सामने - १३ विकेट

WhatsApp channel

संबंधित बातम्या