मराठी बातम्या  /  क्रीडा  /  India Squad T20 world cup : ‘या’ स्टार खेळाडूला नेमंक काय म्हणायचं आहे? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत

India Squad T20 world cup : ‘या’ स्टार खेळाडूला नेमंक काय म्हणायचं आहे? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 20, 2022 09:19 PM IST

Ravi Bishnoi t20 world cup 2022 india squad: टी-20 वर्ल्डकप संघात रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल या दोन प्रमुख फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला अष्टपैलू म्हणून डावखुरा अक्षर पटेल देखील संघात असणार आहे.

Ravi Bishnoi
Ravi Bishnoi

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी T20 विश्वचषकासाठी १५ सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली आहे. विश्वचषकासाठीच्या प्रमुख संघात चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना जागा मिळवता आली नाही. यामध्ये लेगस्पिनर रवी बिश्नोईचा देखील समावेश आहे. मोहम्मद शमी, दीपक चाहर, श्रेसय अय्यर आणि रवी बिश्नोई यांना टी-20 वर्ल्डकप संघात स्टँड बाय म्हणून ठेवण्यात आले आहे.

रवी बिश्नोईने नेमके काय पोस्ट केले आहे

रवी बिश्नोईने आशिया कपमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. मात्र वर्ल्डकप संघात त्याला स्थान मिळाले नाही. यानंतर बिश्नोईने इन्स्टाग्रामवरएका स्टोरी शेअर केली आहे. या माध्यमातून त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. बिश्नोईने 'सूर्य पुन्हा उगवेल आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू' अशी स्टोरी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केली आहे.

टी-20 वर्ल्डकप संघात रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल या दोन प्रमुख फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला अष्टपैलू म्हणून डावखुरा अक्षर पटेल देखील संघात असणार आहे.

आशिया चषकातील बहुतांश खेळाडू वर्ल्डकप संघात

विशेष म्हणजे, आशिया चषक खेळलेल्या बहुतांश खेळाडूंना टी-20 विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आले आहे. जखमी रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. तर जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे प्रमुख वेगवान गोलंदाज रवी बिश्नोई आणि आवेश खान यांच्या जागी संघात परतले आहेत.

टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक (विकेट किपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँड बाय : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर

WhatsApp channel

संबंधित बातम्या