मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KKR vs PBKS Live Streaming: कोलकाता- पंजाब यांच्यात आज सामना; कधी, कुठे पाहणार?

KKR vs PBKS Live Streaming: कोलकाता- पंजाब यांच्यात आज सामना; कधी, कुठे पाहणार?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 08, 2023 08:40 AM IST

आयपीएल २०२३ च्या ५३व्या सामन्यात कोलकाता आणि पंजाब किंग्ज आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघासाठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.

KKR vs PBKS
KKR vs PBKS

IPL 2023: आयपीएल २०२३ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांनी जोरदार सुरुवात केली. परंतु, आता दोन्ही संघ संघर्ष करताना दिसत आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघासाठी विजय महत्त्वाचा आहे. यामुळे दोन्ही संघामधील आजचा सामना अतिशय रोमांचक होण्याची शक्यता आहे. इडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. यामुळे या सामन्यात चौकार आणि षटकाराचा पाऊस पाहायला मिळू शकतो. दरम्यान कोलकाता आणि पंजाब यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? हे जाणून घेऊयात.

कधी, कुठे पाहणार सामना?

कोलकाता आणि पंजाब यांच्यातील हा सामना आज (०९ मे २०२३) संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. त्याच वेळी, या सामन्याचे थेट प्रवाह 'जिओ सिनेमा' अॅपवर उपलब्ध असेल. या अॅपवर तुम्ही हा सामना मोफत पाहू शकता. येथे वेगवेगळ्या भाषांमध्ये सामना पाहता येणार आहे.

कोलकाता नाइट रायडर्स

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, सुनील नरायण, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, सुयश शर्मा, एन जगदीसन, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंग, टिम साउथी, डेव्हिड विसे, उमेश यादव, आर्या देसाई.

पंजाब किंग्स:

प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सिकंदर रझा, अथर्व तायडे, मोहित राठी, शिवम सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत सिंग भाटिया, भानुका राजपक्षे, बलतेज सिंग, विद्वत कवेरप्पा, गुरनूर ब्रार.

WhatsApp channel

विभाग