मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : आयपीएलमध्ये चीयरलीडर्सना ‘हा’ संघ देतो सर्वाधिक मानधन, इतर संघांच्या दुप्पट पैसे मिळतात

IPL 2023 : आयपीएलमध्ये चीयरलीडर्सना ‘हा’ संघ देतो सर्वाधिक मानधन, इतर संघांच्या दुप्पट पैसे मिळतात

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 07, 2023 09:53 PM IST

IPL Cheerleaders Salary : वेगवेगळ्या संघांच्या चीअरलीडर्सना आयपीएल सामन्यांमध्ये वेगवेगळे मानधन मिळते. इतकंच नाही तर मानधनाव्यतिरिक्त या चीअरलीडर्सना राहण्या-खाण्यासह अनेक सुविधा टीमकडून मिळतात.

IPL Cheerleaders Salary
IPL Cheerleaders Salary

IPL Cheerleaders Income : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेचा १६वी सीझन दणक्यात सुरू आहे. दिवसेंदिवस या लीगच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. जगभरातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपासून ते स्पॉन्सर्स आणि फ्रेंचायझी म्हणून मोठमोठाले उद्योगपती या लीगशी संबंधित आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे आयपीएल काही मैदानांवरच खेळवली गेली. पण आता १२ मैदानांवर आयपीएलचे सामने सुरू आहे. शिवाय या वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या चीअरलीडर्सही आयपीएलमध्ये परतल्या आहेत.

आयपीएल सामन्यांमध्ये चीअरलीडर्स आपापल्या टीमला सपोर्ट करताना दिसतात, पण या चीअरलीडर्सना किती पैसे मिळतात हे तुम्हाला माहीत आहे का?

वास्तविक, वेगवेगळ्या संघांच्या चीअरलीडर्सना आयपीएल सामन्यांमध्ये वेगवेगळे मानधन मिळते. इतकंच नाही तर मानधनाव्यतिरिक्त या चीअरलीडर्सना राहण्या-खाण्यासह अनेक सुविधा टीमकडून मिळतात. त्याच वेळी, या काळात चीअरलीडर्सच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात. याचा खर्चदेखील फ्रेंचायझी उचलतात.

चीअरलीडर्सना सर्वाधिक मानधन केकेआर देते

सुत्रांच्या मते, शाहरुख खानची टीम कोलकाता नाइट रायडर्सच्या चीअरलीडर्सना प्रत्येक सामन्यासाठी सुमारे २४ हजार रुपये मिळतात. वास्तविक, आयपीएलमधील चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी सरासरी १४ हजार ते १७ हजार रुपये मिळतात. याशिवाय कामगिरी चांगली असेल तर या चीअरलीडर्सना स्वतंत्रपणे बोनस मिळतो. दुसरीकडे, संघाने सामना जिंकल्यास, निश्चित रकमेव्यतिरिक्त, त्यांना बोनससह अधिक पैसे मिळतात. मात्र, वेगवेगळ्या संघांच्या चीअरलीडर्सना आयपीएल सामन्यांमध्ये वेगवेगळी रक्कम मिळते.

आयपीएल चीअरलीडर्स किती पैसे कमावतात?

मीडिया सूत्रांनुसार, आयपीएल सामन्यासाठी चीअरलीडर्स १४ हजार ते १७ हजार रुपये आकारतात. त्याच वेळी, CSK, पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल चीअरलीडर्सना प्रति सामन्यासाठी १२, ००० रुपये जास्त पैसे देतात. तर मुंबई आणि आरसीबी प्रत्येक सामन्यासाठी २०,००० रुपये देतात. चीअरलीडर्सना सर्वाधिक मानधन KKR देते, ते प्रति सामन्यासाठी २४ हजार रुपये देते.

WhatsApp channel