मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL Playoffs: प्लेऑफची शर्यत अधिक रोमांचक, तीन संघ बाहेर; बंगळुरू, चेन्नई आणि मुंबईच्या आशा वाढल्या

IPL Playoffs: प्लेऑफची शर्यत अधिक रोमांचक, तीन संघ बाहेर; बंगळुरू, चेन्नई आणि मुंबईच्या आशा वाढल्या

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 16, 2023 05:33 PM IST

IPL 2023 Playoffs: सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

IPL 2023
IPL 2023

IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामामध्ये प्लेऑफची शर्यत खूपच रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स यांच्यातील सामन्यानंतर प्लेऑफचे समीकरण थोडे सोपे झाले आहे. हैदराबादला हरवून गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये धडक देणारा पहिला संघ ठरला आहे. तर, हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स , चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढली आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज गुणतालिकेत १५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईला त्यांचा शेवटचा सामना दिल्लीविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात चेन्नईच्या संघाने विजय मिळवल्यास त्याचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. मात्र, पराभवानंतर चेन्नईच्या संघाला दुसऱ्या संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

मुंबई इंडियन्सचे सध्या १४ गुण आहेत. त्यांना आणखी दोन सामने खेळायचे आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईच्या संघाला दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स सध्या १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. लखनौलाही आणखी दोन सामने खेळायचे आहेत. दोन्ही सामने जिंकले तरच लखनौचे प्लेऑफचे तिकीट निश्चित होईल. लखनौने यापैकी एकही सामना गमावल्यास त्यांचे प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग कठीण होऊ शकतो.

बंगळुरुचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. बंगळुरुने १२ सामन्यात १२ गुण प्राप्त केले आहेत. आरसीबीने शेवटचे दोन्ही सामने जिंकले तर प्लेऑफचे तिकीट निश्चित आहे. जर आरसीबीने एक सामना गमावला तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा निव्वळ रनरेटवरच राहील.

राजस्थान रॉयल्सचे केवळ १२ गुण आहेत आणि ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. पंजाब किंग्ज मात्र प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. सनरायझर्स हैदराबाद, केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

WhatsApp channel

विभाग