मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mary Kom: भारताची महान बॉक्सर मेरी कोम निवृत्त झाल्याची बातमी खोटी!

Mary Kom: भारताची महान बॉक्सर मेरी कोम निवृत्त झाल्याची बातमी खोटी!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 25, 2024 12:04 PM IST

Mary Kom Retirement News : आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या नियमांनुसार, पुुष आणि महिला बॉक्सर्सना वयाच्या ४० व्या वर्षापर्यंतच आंतरराष्ट्रीय स्तरावर लढण्याची मुभा असल्याने मेरी कोमने बॉक्सिंगमधून निवृत्ती जाहीर केली.

Mary Kom
Mary Kom (AIBA)

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि सहा वेळा बॉक्सिंगविश्वविजेती ठरलेली एमसी मेरी कोमने निवृत्तीची घोषणा केल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची पात्रता ओलांडलेल्या ४१ वर्षीय सिंधूने सांगितले की, तिने अद्याप ही स्पर्धा सोडण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

'मी अद्याप निवृत्तीची घोषणा केलेली नाही. जेव्हा मला निवृत्तीची घोषणा करायची असेल तेव्हा मी स्वत: माध्यमांसमोर येईन. मी निवृत्तीची घोषणा केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जात आहेत. हे खरे नाही." असे मेरी कोमने पीटीआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

“मी २४ जानेवारी २०२४ रोजी आसाम येथे एका स्कूल इन इव्हेंटमध्ये मुलांशी संवाद साधला, त्यावेळी मी म्हणाले की, मला अजूनही खेळात यश मिळविण्याची भूक आहे. परंतु, ऑलिम्पिकमधील वयोमर्यादा मला भाग घेण्याची परवानगी देत नाही, असे म्हणाले होते. मी अजूनही माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे आणि जेव्हा जेव्हा मी निवृत्तीची घोषणा करेन तेव्हा मी सर्वांना माहिती देईन. कृपया चुकीच्या बातम्या पसरवणे थांबवावे.”

बॉक्सिंगच्या इतिहासात सहा विश्वविजेतेपद पटकावणारी मेरी ही पहिली महिला बॉक्सर आहे. पाच वेळा आशियाई चॅम्पियन बनलेली ती २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला बॉक्सर होती.

लंडन २०१२ च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत या अनुभवी बॉक्सरने ब्राँझ मेडल जिंकले. वयाच्या १८ व्या वर्षी पेन्सिल्व्हेनियातील स्क्रँटन येथे झालेल्या पहिल्या जागतिक स्पर्धेत तिने स्वत:ची ओळख जगाला दाखवून दिली. आपल्या अचूक बॉक्सिंग शैलीने तिने सर्वांना प्रभावित केले आणि ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत ती कमी पडली, पण भविष्यात तिची गणना दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

आगामी काळात एआयबीए महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. तिने २००५, २००६, २००८ आणि २०१० मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. २००८ चे विजेतेपद जिंकल्यानंतर मेरी ने आपल्या जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर ब्रेकवर गेली होती.

Pro Kabaddi League : आजच्या विजयासह जयपूर प्ले-ऑफच्या जवळ, पराभवानंतर बंगालच्या अडचणी वाढल्या

२०१२ च्या ऑलिंपिक पदक जिंकल्यानंतर मेरी पुन्हा एकदा आपल्या तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर सुट्टीवर गेली. तिने पुनरागमन केले. परंतु, २०१८ मध्ये दिल्लीत झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने आपले स्थान पक्के केले.

तिने युक्रेनच्या हॅना ओखोटावर ५-० असा विजय मिळवत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. वर्षभरानंतर तिने आठवे जागतिक पदक पटकावले, जे कोणत्याही पुरुष किंवा महिला बॉक्सरने केलेले सर्वाधिक आहे.

WhatsApp channel

विभाग