Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League) आज (२२ जानेवारी) जयपूर पिंक पँथर्स आणि बंगाल वॉरियर्स (Jaipur Pink vs Panthers Bengal Warriors) आमनेसामने होते. या सामन्यात जयपूरने बंगालचा ४२-२५ असा एकतर्फी धुव्वा उडवला.
या विजयासह जयपूर पिंक पँथर्स पहिल्या स्थानावर कायम असून गेल्या ११ सामन्यांपासून ते अजिंक्य आहेत. त्यांचा पराभव झालेला नाही. बंगाल अजूनही सहाव्या स्थानावर आहे.
जयपूर पिंक पँथर्ससाठी या सामन्यात अर्जुन देशवालने १५ रेड रेड पॉईंट्सची कमाई केली. तर डिफेन्समध्ये अंकुशने ६ टॅकल पॉइंट घेतले. बंगाल वॉरियर्ससाठी मनिंदर सिंगने ९ रेड पॉइंट मिळवले तर वैभव गर्जेने डिफेन्समध्ये ५ टॅकल पॉइंट्सची कमाई केली.
सरतेशेवटी, जयपूर पिंक पँथर्सने जबरदस्त कामगिरी केली आणि विजय मिळवला. या विजयासह जयपूर पिंक पँथर्स प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. तर बंगाल वॉरियर्सला खराब खेळाची किंमत चुकवावी लागली आहे. त्यांना सामन्यातून एकही गुण मिळाला नाही.
सामने - १५, विजय - ११, पराभव - २, टाय -२
सामने - १३, विजय - ११, पराभव - २, टाय - ००
सामने - १४, विजय - ८, पराभव - ४, टाय - २,
सामने - १४, विजय - ८, पराभव - ६, टाय -००
सामने - १४, विजय - ७, पराभव - ५, टाय - १,
सामने - १४, विजय - ६, पराभव - ६, टाय - २,