मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA Playing 11 : कोणाला खेळवायचं धवनपुढं मोठा प्रश्न, आज होऊ शकतो राहुल त्रिपाठीचा डेब्यू

IND vs SA Playing 11 : कोणाला खेळवायचं धवनपुढं मोठा प्रश्न, आज होऊ शकतो राहुल त्रिपाठीचा डेब्यू

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 06, 2022 11:23 AM IST

India Vs South Africa 1st odi match preview: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला आज गुरुवारपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना लखनौच्या अटल विहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर होणार आहे. शिखर धवन या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे. सामना दुपारी दुपारी १:३० वाजता सुरू होईल.

IND vs SA Playing 11
IND vs SA Playing 11

टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेला २-१ ने पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता याच संघाविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. त्यामुळे शिखर धवनकडे वनजे संघाचे नेतृत्व सोपण्यात आले आहे. धवनच्या नेतृत्वाखाली या वनडे मालिकेत अनेक युवा खेळाडू आपली प्रतिभा दाखवताना दिसणार आहेत. मात्र, पहिल्या वनडेसाठी ११ खेळाडूंची निवड करण्यासाठी धवनला खूप मेहनत करावी लागणार आहे.

टीम इंडियाचे टॉप ३ निश्चित

आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचे टॉप ३ निश्चित मानले जात आहेत. शिखर धवनसोबत शुभमन गिल डावाची सुरुवात करेल. गिलने अलीकडेच ओपनर म्हणून टीम इंडियासाठी वनडे फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. गिल पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेऊ इच्छित आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. 

मधल्या फळीत संजू सॅमसनसह इशान किशन

याशिवाय इशान किशन, संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठी हे मधल्या फळीत फलंदाजीचा भार सांभाळताना दिसतील. रजत पाटीदार, मुकेश कुमार आणि शाहबाज अहमद या युवा खेळाडूंचीही प्रथमच संघात निवड झाली आहे, मात्र आजच्या सामन्यात त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे कठीण आहे.

वेगवान गोलंदाजीत शार्दुलसह दीपक चहर आणि सिराज

भारतीय गोलंदाजी आक्रमणाबद्दल सांगायचे तर दीपक चहर, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील, तर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी कुलदीप यादवसह रवी बिश्नोई यांच्या खांद्यावर असेल. पाटीदार, मुकेश आणि शाहबाज यांच्याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि आवेश खान यांनाही आजच्या सामन्यातून बाहेर बसावे लागू शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज

WhatsApp channel