मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA Update: लखनऊ वनडेत पावसामुळे टॉसला उशीर; सामना कधी सुरू होणार? जाणून घ्या

IND vs SA Update: लखनऊ वनडेत पावसामुळे टॉसला उशीर; सामना कधी सुरू होणार? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 06, 2022 12:20 PM IST

India vs South Africa toss 1st ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना उशिरा सुरू होईल.

IND vs SA Update
IND vs SA Update

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामना सुरू होणार होता. मात्र पावसामुळे अर्धा तास उशीर होणार आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे. पावसामुळे टॉसला उशीर होणार असल्याचे बोर्डाने ट्विटद्वारे सांगितले आहे. त्यामुळे सामनाही अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे. भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली ही मालिका खेळणार आहे.

लखनौच्या एकाना स्टेडियमवरील पहिला एकदिवसीय सामना दुपारी दीड वाजता सामना सुरू होणार होता. मात्र पावसामुळे त्याला विलंब होत आहे. बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, या सामन्यासाठी नाणेफेक दुपारी १.३०  वाजता होणार आहे आणि सामना दुपारी २ वाजता सुरू होईल. पाऊस असाच सुरू राहिल्यास आणखी विलंब होऊ शकतो.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज लखनऊमध्ये खेळवला जाईल. यानंतर मालिकेतील दुसरा सामना रांचीमध्ये ९ ऑक्टोबरला होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, इशान किशन, संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कुलदीप यादव, आवेश खान, मोहम्मद सिराज, राहुल त्रिपाठी, मुकेश कुमार, रुतुराज गायकवाड. , शाहबाज अहमद, रवी बिश्नोई

दक्षिण आफ्रिकेचा संघ: जानेमन मलान, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), एडिन मार्कराम, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, वायने पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, एनरिक नॉर्खिया, हेन्रिक क्लासेन, हेन्रिक लुंगी एनगिडी, रीझा हेंड्रिक्स

WhatsApp channel