मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND Vs NZ 1st ODI Highlights : टीम इंडिया हरता हरता जिंकली, ब्रेसवेलचं वादळी शतक व्यर्थ

IND Vs NZ 1st ODI Highlights : टीम इंडिया हरता हरता जिंकली, ब्रेसवेलचं वादळी शतक व्यर्थ

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 18, 2023 09:54 PM IST

India Vs New Zealand 1st ODI Match highlight : भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा १२ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडसमोर सामना जिंकण्यासाठी ३५० धावांचे लक्ष्य होते पण ते केवळ ३३७ धावाच करू शकले.

India Vs New Zealand 1st ODI
India Vs New Zealand 1st ODI

India Vs New Zealand 1st ODI Match : भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा १२ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडसमोर सामना जिंकण्यासाठी ३५० धावांचे लक्ष्य होते पण ते केवळ ३३७ धावाच करू शकले. हा सामना खूपच रोमांचक झाला. 

३५० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने २९ षटकात अवघ्या १३१ धावांत ६ विकेट्स गमावल्या होत्या. टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण येथून मायकल ब्रासवेल आणि मिचेल सँटनर यांनी डाव सांभाळला. दोघांनी सातव्या विकेटसाठी १०२ चेंडूत १६२ धावांची भागीदारी केली. सँटनर ४५ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला.

न्यूझीलंडला शेवटच्या षटकात विजयासाठी २० धावांची आवश्यकता होती. शेवटचे षटक शार्दुल ठाकूरने टाकले. या षटकातील पहिल्याच चेंडूवर ब्रेसवेलने षटकार ठोकला. त्यानंतर दुसरा चेंडू ठाकूरने वाईड टाकला. तर तिसऱ्या चेंडूवर ब्रेसवेल पायचीत झाला. अशाप्रकारे भारताने थरारकरित्या न्यूझीलंडवर विजय मिळवला. न्यूझीलंडचा संघ ४९.२ षटकांत ३३७ धावांवर सर्वबाद झाला. ब्रेसवेलने ७८ चेंडूत १४० धावा चोपल्या. त्याने आपल्या खेळीत १२ चौकार आणि १० षटकार ठोकले.

सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने ५० षटकांत ८ गडी गमावून ३४९ धावा केल्या. गिलने २०८ धावांची खेळी खेळली. 

WhatsApp channel