मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs BAN: ‘हा’ फलंदाज घेणार रोहित शर्माची जागा? पठ्ठ्याच्या नावावर आतापर्यंत २५ शतकं

IND vs BAN: ‘हा’ फलंदाज घेणार रोहित शर्माची जागा? पठ्ठ्याच्या नावावर आतापर्यंत २५ शतकं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 08, 2022 12:00 PM IST

ind vs ban test series Abhimanyu Easwaran: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पुढील उपचारासाठी भारतात परतणार आहे.रोहितच्या जागी कसोटी मालिकेसाठी अभिमन्यू इश्वरनचा संघात समावेश केला जावू शकतो.

ind vs ban test series
ind vs ban test series

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला आहे. तो पुढील उपचारांसाठी भारतात परतत आहे. तर १४ डिसेंबरपासून भारताला बांगलादेश विरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. अंतिम फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत ही मालिका जिंकावी लागणार आहे. दुखापतग्रस्त रोहित शर्माचा बॅकअप म्हणून बंगालचा युवा सलामीवीर अभिमन्यू इसवरनचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

अभिमन्यू इसवरन सध्या बांगलादेशमध्येच असून भारत-अ संघाचा कर्णधार आहे. सलामीवीर म्हणून बांगलादेश-अ विरुद्धच्या दोन्ही अनधिकृत कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावले आहे.

अभिमन्यू इश्वरनचा रेकॉर्ड

२७ वर्षीय अभिमन्यू ईश्वरने फर्स्ट क्लास, लिस्ट-ए आणि टी-२० मध्ये एकूण २५ शतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत त्याच्याकडे खूप अनुभव आहे. त्याने आतापर्यंत ७७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४४ च्या सरासरीने ५४१९ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १७ शतके आणि २३ अर्धशतके केली आहेत. म्हणजेच त्याने ४० वेळा ५० पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळली आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २३३ आहे.

लिस्ट-ए क्रिकेटमध्येही अभिमन्यू ईश्वरनचा रेकॉर्ड चांगला आहे. त्याने आतापर्यंत ७८ सामन्यात ४६ च्या सरासरीने ३३७६ धावा केल्या आहेत. यादरम्यान ७ शतके आणि २१ अर्धशतके केली आहेत. तर १४९ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. T20 चा रेकॉर्ड पाहता त्याने २७ सामन्यात ३८ च्या सरासरीने ७२८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावार एक शतक आणि ३ अर्धशतकं आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या