मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND Vs AUS : निर्णायक मुकाबल्यात पावसाचा व्यत्यय? सामन्यापूर्वी पाहा वेदर रिपोर्ट

IND Vs AUS : निर्णायक मुकाबल्यात पावसाचा व्यत्यय? सामन्यापूर्वी पाहा वेदर रिपोर्ट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 21, 2023 08:26 PM IST

India vs Australia3rd odi match : भारत आणिऑस्ट्रेलिया दरम्यान मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामनाचेन्नईच्या एमए चिदंमबरम स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यातील विजयी टीम मालिकेचे विजेतेपद पटकावेल. अशा महत्वपूर्ण सामन्यात पाऊल बाधा आणू शकतो. तर जाणून घेऊया वेदर रिपोर्ट..

India vs Australia 3rd odi match
India vs Australia 3rd odi match

India vs Australia match Weather Report : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय टीमने पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सने पराभत करून मालिकेत आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सामन्यात कंगारुंनी जोरदार पुनरागमन करत विशाखापट्टणम वनडे सामन्यात भारताला १० विकेट्ने धूळ चारली. सध्या दोन्ही संघांदरम्यान ३ वनडे सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. भारत  आणि ऑस्ट्रेलिया  दरम्यान मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना चेन्नईच्या एमए चिदंमबरम स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यातील विजयी टीम मालिकेचे विजेतेपद पटकावेल. अशा महत्वपूर्ण सामन्यात पाऊल बाधा आणू शकतो. तर जाणून घेऊया वेदर रिपोर्ट..

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बुधवारी चेन्नईमध्ये तिसरा व अंतिम वनडे सामना खेळला जाईल. या सामन्यापूर्वी चेन्नईमध्ये सोमवारी जोरदार पाऊस पडला होता. त्याचबरोबर मंगळवारीही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान सामन्याच्या दिवशी बुधवारी चेन्नईमध्ये पावसाची शक्यता केवळ १६ टक्के आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा सामना पावसामुळे थांबणार नाही, असा हवामानाचा अंदाज आहे. 

पीच रिपोर्ट -
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण सामन्यात पिच फिरकीला अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. अनेक महिन्यांच्या खंडानंतर या मैदानावर एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ शकतो. जेणेकरून खेळपट्टीचा योग्य अंदाज लावला जाईल.

दोन्ही संघाचे प्लेइंग इलेवन -

 भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया – ट्रेविस हेड, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नश लाबुशेन, एलेक्स कैरी (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, मार्कस स्टोयनिस, सीन एबॉट, नाथन एलिस, मिचेल स्टार्क, एडम जम्पा.

WhatsApp channel

विभाग