मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Google Year In Search 2022: २०२२ मध्ये सर्वाधिक काय सर्च झालं? गुगलचा सर्च रिपोर्ट प्रसिद्ध

Google Year In Search 2022: २०२२ मध्ये सर्वाधिक काय सर्च झालं? गुगलचा सर्च रिपोर्ट प्रसिद्ध

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 08, 2022 10:02 PM IST

Google year in search list: गुगलने २०२२ या वर्षातला सर्च रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये क्रिडा जगताचे वर्चस्व दिसून आले आहे. आयपीएलपासून ते फिफा वर्ल्ड कपपर्यंत प्रत्येक स्पोर्टस इव्हेंटमध्ये लोकांनी रस दाखवला आहे. हेच या गुगल सर्च रिपोर्टमधून दिसून येत आहे.

Google Year In Search
Google Year In Search

या वर्षाचा (२०२२) शेवटचा महिना सुरू झाला आहे. म्हणजे, या वर्षाला निरोप देण्याची वेळ आली आहे. क्रीडा जगताबद्दल बोलायचे झाले तर, हे वर्ष संस्मरणीय ठरले आहे. या वर्षात आपल्याला टी-२० विश्वचषक पाहायला मिळाला आणि आता फिफा विश्वचषकाचा थरार सुरू आहे. अशातच आता सर्च इंजिन गुगलने २०२२ मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या कीवर्डची यादीही जारी केली आहे. यामध्ये यावेळी क्रिडा जगताचा दबदबा दिसून आला आहे.

विशेष म्हणजे २०२२ मध्ये खेळाशी संबंधित अनेक कार्यक्रमांनी भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याची सुरुवात आयपीएलने झाली, त्यानंतर टी-२० विश्वचषक, महिला विश्वचषक, फिफा विश्वचषक, आशिया चषक, विम्बल्डनसह इतर अनेक मोठ्या स्पर्धांचा समावेश आहे.

गुगलने वर्षभरात भारतात सर्च केलेल्या मोठ्या कीवर्डची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये टॉप-१० मध्ये ६ स्पोर्ट्स रिलेटेड इव्हेंट्स सामील आहेत. या स्पोर्टस इव्हेंटमध्ये इंडियन प्रीमियर लीग अव्वल स्थानावर आहे. सोबतच फिफा विश्वचषक, आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकाचाही समावेश आहे.

२०२२ मध्ये खालील किवर्ड्स सर्वाधिक सर्च केले गेले

१) Indian Premier League

२) CoWIN

३) FIFA World Cup

४) Asia Cup

५) ICC T20 World Cup

६) Brahmastra: Part One – Shiva

७) e-SHRAM Card

८) Commonwealth Games

९) K.G.F: Chapter 2

१०) Indian Super League

जर आपण फक्त खेळांशी संबंधित कीवर्डबद्दल बोलायचे झाले तर, टॉप-१० मध्ये क्रिकेटचा पूर्ण दबदबा होता. सोबतच इतर खेळांशी संबंधित कीवर्डदेखील समोर आले आहेत. यामध्ये इंडियन प्रीमियर लीग हा कीवर्ड पहिल्या क्रमांकावर होता. तर दुसऱ्या क्रमांकावर फिफा विश्वचषक होता. हा वर्ल्डकप अद्याप कतारमध्ये सुरू आहे.

२०२२ मध्ये खेळाशी संबंधित खालील कीवर्ड्स सर्च केले गेले

१) Indian Premier League

२) FIFA World Cup

३) Asia Cup

४) ICC T20 World Cup

५) Commonwealth Games

६) Indian Super League

७) Pro Kabaddi League

८) ICC Women's Cricket World Cup

९) Australian Open

१०) Wimbledon

२०२२ मध्ये ललित मोदींची देखील चर्चा

याही पुढे जाऊन आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांचे नावदेखील या वर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या लोकांमध्ये सामील आहे. त्याच वर्षी ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या अफेअरचं प्रकरण चव्हाट्यावर आले होते, अशा परिस्थितीत दोघांचीही नावे चर्चेत होती.

WhatsApp channel

संबंधित बातम्या