New Zealand vs England 2nd Test day 3 highlight : इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात वेलिंग्टन येथे कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यात किवी संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. पहिल्या डावाच्या आधारे २३३ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर न्यूझीलंडने फॉलोऑन खेळताना तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत आपली स्थिती काही प्रमाणात भक्कम केली आहे.
वेलिंग्टन कसोटीत इंग्लंडने आपला पहिला डाव ८ बाद ४३५ धावांवर घोषित केला. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने १३८ धावांत ७ विकेट गमावल्या होत्या. येथे किवी संघ २९७ धावांनी पिछाडीवर होता. मात्र, कसोटीचा तिसरा दिवस पूर्णपणे न्यूझीलंडच्या नावावर राहिला. तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने कालच्या धावसंख्येच्या पुढे खेळताना पहिल्या डावात सर्वबाद २०९ धावा केल्या. त्यानंतर फॉलोऑन खेळताना न्यूझीलंडने चांगली सुरुवात केली.
टीम सौदीने ४९ चेंडूत ७३ धावा केल्या
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडने टीम साऊथी (७३) च्या वेगवान फलंदाजी आणि टॉम ब्लंडेलच्या (३८) खेळीमुळे पहिल्या डावात २०९ धावा केल्या. इंग्लंडला पहिल्या डावाच्या आधारे २३३ धावांची आघाडी मिळाली. यानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने न्यूझीलंडला फॉलोऑन देण्याचे ठरवले. हा निर्णय चुकीचा ठरला आणि किवी सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी १४९ धावा जोडून इंग्लंडवर दबाव निर्माण केला.
लॅथम आणि कॉनवेचे अर्धशतक
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात डेव्हॉन कॉनवे (६१) आणि टॉम लॅथम (८३) यांनी पहिल्या विकेटसाठी १४९ धावा जोडल्या. यानंतर केन विल्यमसन (२५) आणि हेन्री निकोल्स (१८) यांच्या खेळीने न्यूझीलंडला २०० च्या पुढे नेले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा किवी संघाने ३ गडी गमावून २०२ धावा केल्या होत्या. ते आता इंग्लंडपेक्षा फक्त २४ धावांनी मागे आहेत. दरम्यान वेलिंग्टनची विकेट स्पिनरसाठी उपयुक्त ठरली आहे. वेगवान गोलंदाजांना येथे फारशी मदत मिळत नाही. इंग्लंडच्या फिरकीपटूंनी किवी संघाच्या तीनही विकेट घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या