मराठी बातम्या  /  क्रीडा  /  World Cup विजेता कॅप्टन इयॉन मॉर्गन निवृत्त? नवा कर्णधार कोण, स्टोक्स की बटलर
eion morgan
eion morgan
27 June 2022, 16:46 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 16:46 IST
  • इयॉन मॉर्गनने (Eoin Morgan) नेदरलँडविरुद्धच्या मालिकेपूर्वीच निवृत्तीचे संकेत दिले होते. मॉर्गन निवृत्त झाल्यास जोस बटलर (jos butller)  इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा नवा कर्णधार होऊ शकतो.

इंग्लंड क्रिकेट बोर्डात (ECB) सध्या पदांच्या बदलाचे वारे वाहत आहेत. क्रिकेट बोर्डाच्या संचालकापासून ते कसोटी संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार हे गेल्या काही महिन्यांमध्येच बदलले गेले आहेत. आता इंग्लंडच्या वन-डे आणि टी-२० संघाचा कर्णधारही बदलू शकतो, अशी चर्चा सुरु आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२०१९ मध्ये इंग्लंडला पहिले एकदिवसीय सामन्यांचे विश्वविजेपद मिळवून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आले आहे. मॉर्गन निवृत्त झाल्यास जोस बटलर इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा नवा कर्णधार होऊ शकतो. बटलरसोबत बेन स्टोक्सच्याही नावाच विचार होऊ शकतो. स्टोक्स सध्या कसोटी संघाचा कर्णधार आहे.

नेदरलँडविरुद्धच्या मालिकेपूर्वी मॉर्गनने तसे संकेतही दिले होते. 'जर फलंदाजीत मी धावा करू शकलो नाही तर मी क्रिकेट सोडून देईन', असे त्याने म्हटले होते. यानंतर नेदरलँड्सविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याच्या बॅटमधून एकही धाव आली नाही. त्याला दोन डावात खातेही उघडता आले नाही. तर त्याला एका सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. यानंतर आता मॉर्गनच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.

२०१५ नंतर कर्णधार पदी-

२०१५ विश्वचषकानंतर इयॉन मॉर्गनची इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-२० संघांच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. २०१५ च्या विश्वचषकात इंग्लंडचा संघ ग्रुप स्टेजमधूनच बाद झाला होता. इंग्लंड संघाला बांगलादेशविरुद्धही पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर मॉर्गनने इंग्लंडची क्रिकेट संघाचा अंदाजच बदलून टाकला, त्याने संघात अनेक सुधारणा केल्या. जास्तीत जास्त ऑलराऊंडर्सना त्याने संघात स्थान द्यायला सुरुवात केली. तसेच, संपूर्ण संघात आक्रमक फलंदाजांचा भरणा केला.

मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने निडर होऊन खेळण्यास सुरुवात केली. त्याच्याच नेतृत्वात इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेकदा ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारा मॉर्गन पहिला कर्णधार ठरला. २०१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडने रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा लॉर्डसवर सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता.

मॉर्गनच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने अनेकवेळा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४०० धावांचा टप्पाही पार केला आहे. सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा इंग्लंडच्याच नावावर आहे, त्यांनी तीनवेळा ४०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.