मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WPL 2023 : गुजरातची खेळाडू म्हणतेय, मी भूतबाधेतून सावरतेय… फ्रेंचायझीनं रात्रीत घरचा रस्ता दाखवला

WPL 2023 : गुजरातची खेळाडू म्हणतेय, मी भूतबाधेतून सावरतेय… फ्रेंचायझीनं रात्रीत घरचा रस्ता दाखवला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 04, 2023 10:18 PM IST

Deandra Dottin WPL 2023 : महिला प्रीमियर लीग २०२३ सुरू झाली आहे. पण त्यासोबतच मोठा वादही निर्माण झाला आहे. खरेतर, गुजरात जायंट्सचा भाग असलेली वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू डिआंड्रा डॉटिन ही सामन्याच्या आदल्या दिवशी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडली आहे. मात्र, डिआंड्रा डॉटिनने आपण दुखापतग्रस्त नसल्याचे म्हटले आहे.

Deandra Dottin WPL 2023
Deandra Dottin WPL 2023

महिला प्रीमियर लीग २०२३ ची (WPL 2023) दणक्यात सुरुवात झाली आहे. या मोसमातील पहिला सामना गुजरात जायंट्स (GG) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात होत आहे. सीझनच्या सुरुवातीच्या सामन्याच्या आधी रंगारंग उद्घाटन समारंभदेखील झाला. ज्यामध्ये कियारा अडवाणी, क्रिती सॅनन आणि एपी ढिल्लन यांसारख्या कलाकारांनी सादरीकरण केले.

मात्र, पहिल्या सामन्यापूर्वी एक विचित्र प्रकार समोर आला आहे. खरं तर, गुजरात जायंट्सची अष्टपैलू खेळाडू डिआंड्रा डॉटिन स्पर्धेतून बाहेर पडली आहे. ती वेस्ट इंडिजला परत गेली आहे.

फ्रँचायझीने यामागचे कारण दुखापत असल्याचे सांगितले आहे. पण हे प्रकरण काहीतरी वेगळेच असल्याचे समोर आले आहे. वास्तविक डिआंड्रा डॉटिनने सोशल मीडियावर ट्विट करून ती पूर्णपणे बरी असल्याची माहिती दिली आहे. तिने ट्विटमध्ये लिहिले की, 'मला मेसेजेस करणाऱ्यांचे धन्यवाद, पण सत्य हे आहे की मी भूतबाधेतून सावरत आहे.' यानंतर वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, गुजरात जायंट्सच्या संघाने डब्ल्यूपीएलच्या लिलावात डिआंड्रा डॉटिनला ६० लाखांमध्ये खरेदी केले होते. अशा परिस्थितीत, मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिआंड्रा डॉटिनला विचित्र कारणास्तव संघातून वगळण्यात आले आहे, त्यामुळे दुखापत हे केवळ एक निमित्त असल्याचे दिसत आहे.

किमने ग्राथने घेतली डिआंड्रा डॉटिनची जागा

गुजरात संघाने डिआंड्रा डॉटिनच्या जागी किम ग्राथला आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले आहे. फ्रँचायझीने ट्विट करून त्याची माहिती दिली आहे.

मुंबईच्या २०७ धावा

WPL २०२३ च्या मधील पहिल्या सामन्यात, गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि त्यांनी निर्धारित २० षटकात २०७ धावांचा डोंगर उभारला आहे. त्याच वेळी, या सामन्यापूर्वी, एक नेत्रदीपक उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये कियारा अडवाणी, क्रिती सॅनन आणि एपी ढिल्लन या कलाकारांनी त्यांचे नेत्रदीपक परफॉर्मन्स सादर केले.

WhatsApp channel