मराठी बातम्या  /  क्रीडा  /  David Warner Pathaan : भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी डेव्हिड वॉर्नर बनला 'पठाण', खतरनाक व्हिडिओ पाहाच!

David Warner Pathaan : भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी डेव्हिड वॉर्नर बनला 'पठाण', खतरनाक व्हिडिओ पाहाच!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 28, 2023 06:51 PM IST

david warner pathaan video : ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर भारतात येणार आहे. पण त्याआधी तो भारताच्या रंगात रंगला आहे. डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शाहरुखच्या कॅरेक्टरमध्ये आहे.

David Warner Pathaan
David Warner Pathaan

David Warner Pathaan : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. ९ फेब्रुवारीपासून दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. हा दौरा सुरू होण्यापूर्वीच स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने भारताच्या रंगात रंगण्यास सुरुवात केली आहे. डेव्हिड वॉर्नरने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो 'पठाण' झाला आहे.

डेव्हिड वॉर्नर अनेकदा त्याचे मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. आता त्याने पठाणचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्याच्या जागी शाहरुख खानचे कॅरेक्टर दिसत आहे. तसेच, तो दीपिका पदुकोणसोबत रोमान्स करताना दिसत आहे.

डेव्हिड वॉर्नरचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्याला खूप पसंती दिली जात आहे. याआधीही डेव्हिड वॉर्नरने साऊथ आणि बॉलीवूड चित्रपटांचे असे अनेक व्हिडीओज पोस्ट केले आहेत. याच कारणामुळे डेव्हिड वॉर्नरचे भारतातील सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत.

बॉर्डर-गावस्कर मालिकेत सगळ्यांच्या नजरा डेव्हिड वॉर्नरवर असणार आहेत. पण सतत देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळल्याने, तो थकला असल्याचेही त्याने नमूद केले आहे. मात्र, या दौऱ्यापर्यंत पूर्णपणे फिट आणि सज्ज होईल, अशीही त्याला आशा आहे.

ऑस्ट्रेलियन संघ केवळ कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येत नाही, तर त्यांना एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. यासोबतच एप्रिल-मेमध्ये आयपीएलही होणार असल्याने आयपीएलमध्ये सहभागी होणारे अनेक खेळाडू येथे दीर्घकाळ राहू शकतात.

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

पहिली कसोटी - ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्ली

तिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, धर्मशाला

चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, अहमदाबाद

WhatsApp channel