BCCI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हा सामना झाल्यानंतर आयसीसीच्या एलिट पॅनेलचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी इंदूरची खेळपट्टीला ३ डिमेरीट पॉईंट्स दिले. इंदूरची खेळपट्टी खराब होती आणि कसोटी सामन्यासाठी योग्य नसल्याचे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले. आयसीसीच्या या निर्णयानंतर स्टेडियमवर बंदी येऊ शकते.परंतु, इंदूर खेळपट्टीसंदर्भात भारतीय निमायक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आयसीसीच्या रेटिंगला अव्हान देण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
आयसीसी मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्टेडियमला तीन डिमेरिट गुण दिले आहेत. बीसीसीआयला अपिलासाठी १४ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. आयसीसीच्या या निर्णयानंतर स्टेडियमवर १२ महिन्यांची बंदी घातली जाऊ शकते.
इंडियन एक्सप्रेसशी झालेल्या संभाषणात बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही परस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊ. ख्रिस ब्रॉड म्हणाले होते की, खेळपट्टी खूप कोरडी होती. बॅट आणि बॉल यांच्यात कोणतेही संतुलन नव्हते. सुरुवातीपासूनच फिरकीपटूंना मदत मिळत होती. सामन्याच्या पाचव्या चेंडूपासूनच खेळपट्टी खराब होण्यास सुरुवात झाली. या खेळपट्टीवर चेंडू अंधाधुंद उसळी घेत होता."
आयसीसीच्या नियमानुसार, बीसीसीआयकडे आयसीसीच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी १४ दिवसांचा कालवधी असेल. एखाद्या स्टेडियमला पाच वर्षात पाच डिमेरिट गुण देण्यात आले. तर, त्या मैदानावर बंदी घालण्याचा आयसीसीकडे अधिकार आहे. तसेच या मैदानात तब्बल १२ महिने कोणताही सामना खेळला जाऊ शकत नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील नागपूर आणि दिल्लीच्या खेळपट्टीला सामनाधिकारीने सरासरी गुण दिले होते.
संबंधित बातम्या