मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Babar Azam: काय सांगता? बाबर आझमचा कव्हर ड्राइव्ह फिजीक्सच्या पुस्तकात! काय आहे हे प्रकरण?

Babar Azam: काय सांगता? बाबर आझमचा कव्हर ड्राइव्ह फिजीक्सच्या पुस्तकात! काय आहे हे प्रकरण?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 13, 2022 06:31 PM IST

babar azam cover drive-physics syllabus pakistan : बाबर आझमबाबत एक मजेशीर बाब समोर येत आहे. ती म्हणजे, पाकिस्तानमधील ९ वी वर्गाच्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकात त्याच्या कव्हर ड्राईव्हबाबत एक प्रश्न विचारण्यात आला आहे. सोशल मीडियावर ही बाब मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Babar Azam
Babar Azam

बाबर आझमची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. पाकिस्तानचा कर्णधार असलेल्या बाबरने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आशिया चषकात मात्र, त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली. पण त्याचा संघ फायनलपर्यंत पोहोचला होता. आता टी-२० विश्वचषकापूर्वी बाबरच्या संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ७ टी-२० सामने खेळायचे आहेत.

या दरम्यान, बाबरबाबत एक मजेशीर बाब समोर येत आहे. ती म्हणजे, पाकिस्तानमधील ९ वी वर्गाच्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकात त्याच्या कव्हर ड्राईव्हबाबत एक प्रश्न विचारण्यात आला आहे. सोशल मीडियावर ही बाब मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी पत्रकार सिराज हसन यांनी बाबर संबंधित हा प्रश्न सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर चाहतेही अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले आहे - पाकिस्तान एज्युकेशन बोर्डाचा चांगला अभ्यासक्रम आहे. त्याच वेळी, दुसऱ्याने लिहिले की, जर बाबरने हा प्रश्न वाचला तर तो कव्हर ड्राइव्ह खेळणे सोडून देईल. दरम्यान बऱ्याच लोकांनी हे चुकीचे असल्याचेही सांगितले आहे.

बाबर आशिया चषकात फ्लॉप

बाबर आझम टी-20 आशिया चषकात पूर्णपणे फ्लॉप ठरला. आशिया चषकात त्याची सर्वोच्च धावसंख्या ३० होती. फायनलमध्येही त्याला केवळ ५ धावा करता आल्या. पहिल्या सामन्यात त्याने भारताविरुद्ध १० धावा केल्या होत्या. पुढच्या ५ सामन्यात त्याने ९, १४, ०, ३० आणि ५ धावा केल्या. पाकिस्तानचा संघ फायनल गाठण्यात नक्कीच यशस्वी ठरला. मात्र, श्रीलंकेकडून त्यांना २३ पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानच्या संघाला २०१२ पासून आशिया चषकाचे विजेतेपद मिळवता आलेले नाही.

बाबर आझमचे करिअर

बाबर आझम बराच काळ टी-20 चा नंबर-१ फलंदाज होता. त्याने ८० T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४२ च्या सरासरीने २७५४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने एक शतक आणि २६ अर्धशतके केली आहेत. तर ९२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६० च्या सरासरीने बाबरने ४६६४ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने १७ शतके आणि २२ अर्धशतके केली आहेत. एवढेच नाही तर त्याने ४२ कसोटी सामन्यांच्या ७५ डावात ४७ च्या सरासरीने ३१२२ धावा केल्या आहेत. त्याने ७ शतके आणि २३ अर्धशतके केली आहेत.

 

 

WhatsApp channel