मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mystery Girl-Asia Cup: जिकडं-तिकडं 'या' मिस्ट्री गर्लचीच चर्चा, चाहते म्हणाले हिच्यासाठी तर...

Mystery Girl-Asia Cup: जिकडं-तिकडं 'या' मिस्ट्री गर्लचीच चर्चा, चाहते म्हणाले हिच्यासाठी तर...

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 13, 2022 12:02 PM IST

आशिया कप २०२२ चा अंतिम सामना रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी धुव्वा उडवला. मात्र, या सामन्यादरम्यान एका पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर “हीच्यासाठीच तर फायनल सामना पूर्ण पाहिला”, असे चाहते म्हणत आहेत.

asia cup
asia cup

आशिया कप २०२२ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला २३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना रविवारी (११ सप्टेबर) दुबई इंटरनॅशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यादरम्यानचा एक क्युट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक मिस्ट्री गर्ल दिसत आहे.

ही व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल पाकिस्तानची आहे. या तरुणीची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहेत. या व्हायरल व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आहेत. काहींनी तर “फायनल सामना पूर्ण पाहण्याचे एकमेव कारण हीच आहे”. अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, ही व्हायरल झालेली व्हिडीओ क्लीप श्रीलंकेची फलंदाजी सुरु असतानाची आहे. त्यावेळी एका प्रसंगादरम्यान या तरुणीने असे क्युट रिअॅक्शन दिले होते.

आशिया चषकात श्रीलंकन खेळाडूंची शानदार कामगिरी

ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेची कामगिरी फारशी खास नव्हती. विशेष म्हणजे, श्रीलंकेचा संघ विजेतेपदाचा दावेदारही मानला जात नव्हता. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तानला या स्पर्धेच्या जेतेपदाचे दावेदार मानले जात होते. तसेच, पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा पराभवदेखील केला होता.

मात्र, या जिव्हारी लागणाऱ्या या पराभवानंतर श्रीलंकेने जोरदार कमबॅक केले आणि स्पर्धेतील सर्वच संघांचा पराभव करुन आशिया चषकावर आपले नाव कोरले.

अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा केल्या होत्या. भानुका राजपक्षेने सर्वाधिक ७१ आणि वनिंदू हसरंगाने ३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ १४७ धावाच करू शकला. मोहम्मद रिझवानने ५५ आणि इप्तीखार अहमदने ३२ धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशनने ४ आणि वनिंदू हसरंगाने ३ बळी घेतले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या