मराठी बातम्या  /  धर्म  /  Somwar Upay : घरात हवीय सुख,समृद्धी आणि शांती मग अवश्य करा 'हे' उपाय

Somwar Upay : घरात हवीय सुख,समृद्धी आणि शांती मग अवश्य करा 'हे' उपाय

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 06, 2023 11:42 AM IST

Take Blessings Of Lord Shiva : सोमवारी भगवान शिवाची मनोभावे आराधना केल्यास शिव प्रसन्न होतात आणि जगाचा विधाता प्रसन्न झाला तर अशक्यही शक्य होतं.

सोमवारी कोणते उपाय करावे
सोमवारी कोणते उपाय करावे (हिंदुस्तान टाइम्स)

सोमवारचा वार भगवान शंकराला समर्पित वार आहे. भगवान शंकराला जगाचा पालनकर्ता म्हणून संबोधलं जातं. शंकराला भोलेनाथ म्हणूनही ओळखलं जातं. सोमवार याच महादेवाला समर्पित वार असल्याने सोमवारी काही खास गोष्टी आहेत, ज्या केल्याने शंकर प्रसन्न होतात आणि तुमची रखडलेली सर्व कामं पूर्ण करतात. सोमवारी करायचे सोमवारचे उपाय कोणते आहेत पाहूया.

काय आहेत सोमवारचे उपाय

भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख-समृद्धीचे वरदान मिळते. जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख-समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे भगवान शिवाची पूजा करा.

दीर्घकाळापर्यंत कोणतेही काम करण्यात अडथळा येत असेल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करावी. शिवलिंगावर पूजेत बेलपत्र, दूध आणि पाण्याने अभिषेक करावा.

जर एखाद्या व्यक्तीला खूप कष्ट करूनही पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळत नसेल तर त्याने सोमवारी विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा करावी. सोमवारी रात्री शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा, हा उपाय ४१ सोमवार नियमित करा. असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात आणि त्यांची आर्थिक समस्या दूर करतात. यासोबतच पैशांची बचत करण्यातही फायदा होतो असं सांगितलं जातं.

सोमवारी शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील नोकरी-व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात. हा उपाय केल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

 

WhatsApp channel

विभाग