मराठी बातम्या  /  religion  /  Chaitra Navratri 2023 : नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणं का आहे शास्त्रीयदृष्ट्या फायदेशीर?
नवरात्रीला उपवास का करावा
नवरात्रीला उपवास का करावा (हिंदुस्तान टाइम्स)

Chaitra Navratri 2023 : नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणं का आहे शास्त्रीयदृष्ट्या फायदेशीर?

24 March 2023, 15:05 ISTDilip Ramchandra Vaze

Fasting In Navratri : कोणत्याही सण उत्सवाला फलाहार करणे म्हणजेच रोजच्या खाद्यपदार्थांकडे त्या दिवशी दुर्लक्ष करणे हे उत्तम मानलं जातं आणि अनेक जण महत्वाच्या दिवशी उपवास ठेवतात

चैत्र नवरात्र किंवा शारदीय नवरात्र दोन्ही नवरात्रीत देवीचा जागर होतो. दुर्गेच्या विविध रुपांचा, शक्तींचा आपण अनुभव घेतो आणि त्यांची पूजा करतो. कोणत्याही सण उत्सवाला फलाहार करणे म्हणजेच रोजच्या खाद्यपदार्थांकडे त्या दिवशी दुर्लक्ष करणे हे उत्तम मानलं जातं आणि अनेक जण महत्वाच्या दिवशी उपवास ठेवतात म्हणजेच आपल्या शरीराला फळांचा आधार देतात किंवा काही पचायला हलकं असेल अशा गोष्टी खातात.

ट्रेंडिंग न्यूज

देवाला नेहमी सात्विक नैवेद्य अर्पण करावा असं शास्त्र सांगतं. मात्र त्यामागची भूमीका काय असते. अगदी चैत्र नवरात्रीबद्दल बोलायचं झालं तर अनेकजण नवरात्रीत उपवास धरतात. उपवास केल्याने त्याचा शरीराला शास्त्रीयदृष्ट्या काय फायदा होतो हे आपण आज जाणून घेणार आहोत.

सात्विक अन्न देतं पचनसंस्थेला आराम

सात्त्विक अन्न पचनसंस्थेला आराम देते आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. नवरात्रीमध्ये उपवास करण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे शरीरातील बाहेर काढणे. दिवसातून एकदा हलके जेवण घेतल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते.

आयुर्वेदात अनेक गोष्टींचे वर्णन सात्विक अन्न म्हणून केलं गेलं आहे. यामध्ये गव्हाच्या पिठाच्या पोळीचं सेवन करणे खूप फायदेशीर मानलं गेलं आहे. गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ सहज पचतात.

याशिवाय उपवासात तुम्ही फळांवर जास्त भर देऊ शकता. फळं आणि सुकामेवा यांच्या सेवनाचा शरीराला चांगला फायदा होतो. याशिवाय दही, दूध आणि ताक यांचे सेवन करणे देखील फायदेशीर आहे.

नवरात्रीत ९ दिवस उपवास केल्याचे फायदे

नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केल्याने शरीराला शुद्ध अन्न मिळते. सात्त्विक अन्न शुद्ध आणि संतुलित मानले जाते. यामुळे शरीरात कोणताही विकार निर्माण होत नाही. तामसिक अन्न भलेही चवदार असेल, पण असे अन्न पचवण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते.

त्यामुळे सण उत्सव असतील तर उपवास नक्की करा आणि त्याला फळांची जोड द्यायला विसरू नका.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग