मराठी बातम्या  /  धर्म  /  Amalaki Ekadashi 2023 : आमलकी एकादशीच्या दिवशी तयार होतायत तीन अत्यंत शुभ योग

Amalaki Ekadashi 2023 : आमलकी एकादशीच्या दिवशी तयार होतायत तीन अत्यंत शुभ योग

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Feb 28, 2023 08:09 AM IST

Three Shubh Yoga On Amalaki Ekadashi : आवळ्याचं महत्व विशद करणारी एकादशी म्हणून या एकादशीचं महत्व आहे. यंदा तीन अत्यंत शुभ मुहूर्त आमलकी एकादशीच्या दिवशी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच आमलकी एकादशीचा दिवस अत्यंत शुभ मानला गेला आहे.

भगवान श्रीविष्णू
भगवान श्रीविष्णू (हिंदुस्तान टाइम्स)

येत्या शुक्रवारी अर्थात ३ मार्च २०२३ रोजी आमलकी एकादशी साजरी केली जाणार आहे. आवळ्याचं महत्व विशद करणारी एकादशी म्हणून या एकादशीचं महत्व आहे. यंदा तीन अत्यंत शुभ मुहूर्त आमलकी एकादशीच्या दिवशी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच आमलकी एकादशीचा दिवस अत्यंत शुभ मानला गेला आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी कोणते तीन शुभ मुहूर्त बनणार आहेत, याची माहिती आपण घेणार आहोतच. आधी आमलकी एकादशीबद्दल जाणून घेऊया.

काय आहे आमलकी एकादशीचं महत्व

ब्रम्हदेवांनी सृष्टीसोबतच आवळ्याचं झाड पृथ्वीवर निर्माण केलं. सर्व नद्यांमध्ये पवित्र नदी म्हणून आपण गंगेला पाहातो, देवांमध्ये भगवान श्रीविष्णूंना पाहातो तसंच आवळ्याला शास्त्रामध्ये परमोच्च स्थान प्राप्त झालं आहे. हे झाड अनेक आयुर्वेदीक फायदे घेऊन येण्याबरोबरच भगवान श्रीविष्णूंनाही हे झाड अत्यंत प्रिय आहे. असं म्हणतात की श्रीविष्णूंनी ही एकादशी जो करेल त्याला गोदानाचे पुण्य लाभेल असं सांगितलं होतं. त्यामुळेच फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलकी एकादशी असं संबोधलं जातं.

आमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. जेव्हा अधिकमहिना येतो तेव्हा यांची संख्या २६ असते.

आमलकी एकादशीला तयार होणारे तीन शुभ योग कोणते

आमलकी एकादशीला तीन अतिशय शुभ योग तयार होत आहेत. पंचांगानुसार या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग आणि शोभन योग तयार होतील. सौभाग्य योग संध्याकाळी ५.१५ पर्यंत राहील, त्यानंतर शोभन योग सुरू होईल. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ६.०८ ते दुपारी २.१३ पर्यंत असेल.

आमलकी एकादशीची पूजा पद्धत

आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची आवळ्याने पूजा केली जाते. या विशेष दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. यानंतर भगवान विष्णूची पूजा करून त्यांना आवळा अर्पण करावे. यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करावी. या विशेष दिवशी आवळा वृक्षाच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आवळ्याच्या झाडाला धूप, दीप, इत्यादी अर्पण करा. पूजेनंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग