मराठी बातम्या  /  religion  /  Feng Shui Tips: 'या' फेंगशुई टिप्स बदलून टाकतील तुमची इमेज, ऑफिसमध्ये होईल कौतुकाचा वर्षाव
Feng Shui Tips
Feng Shui Tips

Feng Shui Tips: 'या' फेंगशुई टिप्स बदलून टाकतील तुमची इमेज, ऑफिसमध्ये होईल कौतुकाचा वर्षाव

18 November 2022, 18:08 ISTGanesh Pandurang Kadam

Feng Shui tips for Office: फेंगशुई परंपरेत कार्यालयीन वातावरण सकारात्मक राखण्यासाठी व त्याद्वारे यश मिळवण्यासाठी उत्तम मार्गदर्शन करून ठेवलं आहे.

Feng Shui tips for Office: शांत, सकारात्मक व आनंदी वातावरणासाठी आणि यश मिळवण्याच्या दृष्टीनं चीनच्या फेंग शुई परंपरेतील टिप्स अत्यंत उपयुक्त मानल्या जातात. घर, शाळेबरोबरच कार्यालयातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी व सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी फेंगशुई मदत करते.   

ट्रेंडिंग न्यूज

जिथं लोक एकमेकांना सहकार्य करत असतात. मिळून-मिसळून हसतखेळत काम करतात. कोणाला काही अडचण आली तर मदतीसाठी तत्पर असतात, अशा ठिकाणी काम करायला प्रत्येकालाच आवडतं. अशा ठिकाणी मन शांत व समाधानी राहतं. एक आत्मविश्वास निर्माण होतो. काम करण्याची क्षमता वाढते. फेंगशुई परंपरा यात कशी मदत करते पाहू…

आपले टेबल नीटनेटके ठेवा!

फेंगशुई परंपरेनुसार, तुमच्या कामाच्या टेबलावर अनेक वस्तू विखुरलेल्या असतील तर त्याचा तुमच्या कार्यक्षमतेवर्या नकारात्मक परिणाम होतो. हा अव्यवस्थितपणा तुमच्या उत्पादकतेमध्ये अडथळा ठरू शकतो. त्यामुळं कोणत्याही व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी सुधारायची असेल तर सर्वात आधी तुमचे टेबल नीटनेटके करा. रोजच्या कामासाठी हव्या असलेल्या मोजक्याच गोष्टी टेबलावर ठेवा. रोजच्या वापरात येत नसलेल्या किंवा क्वचितच वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू कपाटात ठेवा. नीटनेटकेपणा हा जीवनात महत्त्वाचा असतो. तुम्ही कामात किती यशस्वी होऊ शकता हे त्यावरून समजते.

निळा रंग

फेंगशुई नुसार, निळा रंग भावनांना हायलाइट करण्यात खूप मदत करतो. याचा परिणाम उत्पादकतेवर होतो. व्यवसायाच्या दृष्टीनं निळा रंग खूप शुभ मानला जातो. आकाश आणि समुद्र हे मुक्त आत्म्याचे प्रतीक मानले जाते, निळा रंग हा त्याचाच निदर्शक आहे. निवांतपणाची व  शांततेची भावना निर्माण करणारा हा एक दिलासादायक रंग आहे. व्यावसायिक जगात निष्ठा, जबाबदारी, विश्वासाची भावना निर्माण करण्यास हा रंग मदत करतो.

 

(या लेखातील माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे, असा दावा आम्ही करत नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

विभाग