मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fengshui Tips: या सोप्या फेंगशुई टिप्स दूर करतील तुमची आर्थिक चणचण

Fengshui Tips: या सोप्या फेंगशुई टिप्स दूर करतील तुमची आर्थिक चणचण

Hiral Shriram Gawande HT Marathi
Nov 17, 2022 06:01 PM IST

Fengshui Tips For Money: फेंगशुईमध्ये करिअरच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. असे म्हटले जाते की फेंगशुईच्या वस्तू घरात आणल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.

फेंगशुई टिप्स
फेंगशुई टिप्स

Fengshui Tips for Money and Wealth: भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे, चिनी वास्तुशास्त्र फेंगशुई देखील खूप लोकप्रिय आहे. फेंगशुईमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतात. असे म्हटले जाते की फेंगशुई उपाय केल्याने वास्तुदोषाशी संबंधित अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते. जाणून घ्या फेंगशुईचे सोपे उपाय, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगतीसोबतच उत्पन्नही वाढू शकते.

१. पिरॅमिड - धनाच्या आगमनासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी ऑफिस किंवा घरात पिरॅमिड करणे फायदेशीर मानले जाते. घराच्या पूर्व दिशेला किंवा ऑफिसच्या टेबलावर पिरॅमिड ठेवल्याने आर्थिक प्रगती होते असे मानले जाते.

२. क्रिस्टल लँप - फेंगशुई शास्त्रानुसार क्रिस्टल लँप दररोज संध्याकाळी दोन तास लावल्यास घरात देवी लक्ष्मी वास करते. लक्षात ठेवा दिवा नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावा.

३. तीन पायांचा बेडूक - जर तुम्हाला उत्पन्न वाढवायचे असेल तर फेंगशुईनुसार तीन पायांचा बेडूक घरात ठेवावा. असे केल्याने देवी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते.

४. विंड चाइम - घरात विंड चाइम लावणे खूप शुभ मानले जाते. वास्तूनुसार दरवाजा किंवा खिडकीवर विंड चाइम लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

५. लाफिंग बुद्धा - फेंगशुईनुसार लाफिंग बुद्धा घरात किंवा ऑफिसच्या टेबलावर ठेवता येते. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते असे म्हणतात. समस्या दूर होतात.

६. धातूचे कासव - फेंगशुईनुसार धातूचे कासव घरात ठेवल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो. यासोबत संपत्ती येते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग