Diwali Home Tips in Marathi : हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध असलेला दिवाळीचा सण काही दिवसांवर येवून ठेपलेला आहे. त्यामुळं अनेक लोकांनी दिवाळीच्या सणाची जोरदार तयारी सुरू केली आहे. दिवाळीला कपडे, फराळ आणि अन्य आकर्षक साहित्यांची खरेदी केली जाते. त्यासाठी बक्कळ पैसे खर्च केले जातात. परंतु यंदाच्या दिवाळीला अनेक लोकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं सणासुदीच्या काळात आणि दिवाळीला कौटुंबिक समस्या आणि पैशांची तंगी दूर करण्यासाठी काय करायला हवं, जाणून घेवूयात.
चीनी फेंग शूई शास्त्रानुसार, दिवाळीच्या सणापूर्वी घरामध्ये फिश इक्वेरियम आणायला हवं. त्यामुळं घरातील लोकांमध्ये सकारात्मक उर्जा संचारत असते. याशिवाय आर्थिक समस्या दूर होत असतात. दिवाळीच्या दिवशी घरात किंवा ऑफिसमध्ये कासवाची मूर्ती बसवायला हवी. त्यामुळं समाजात तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढत असते. त्यामुळं कासवाची मूर्ती आणि फिश इक्वेरियम घरात लावल्यास तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्तता मिळू शकते. याशिवाय दिवाळीला चीनी नाण्यांना लाल रंगाच्या दोऱ्यांमध्ये गुंडाळून घरात लावायला हवं. त्यामुळं देखील कुटुंबातील लोकांवर सकारात्मक प्रभाव पडत असतो.
दिवाळीला घरात हसत्या बुद्धाची मूर्ती लावणं देखील शुभ मानलं जातं. त्यामुळं घरातील लोकांवरील आरोग्याचे संकट टळतात. तसेच आर्थिक तंगी दूर होण्यास मदत होते. फेंग शूई शास्त्रात सुख, शांती आणि समृद्धीसाठी हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. घरात आल्यानंतर पहिली नजर मूर्तीवर पडेल, अशा ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला हवी. याशिवाय चीनी ड्रॅगनच्या मूर्तीची घरात स्थापना केल्यामुळंही आर्थिक प्रश्न सुटू शकतात. त्यामुळं यंदाच्या दिवाळीपूर्वी तुम्हाला आर्थिक संकटं सतावत असतील तर या गोष्टींचा वापर करायला हवा.