मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vastu Tips : वारंवार प्रयत्न करूनही विवाह जुळत नाहीत?, मग वास्तुशास्त्रातले 'हे' उपाय करून पाहा

Vastu Tips : वारंवार प्रयत्न करूनही विवाह जुळत नाहीत?, मग वास्तुशास्त्रातले 'हे' उपाय करून पाहा

May 29, 2023 07:39 AM IST
  • twitter
  • twitter
Vastu Shastra For Marriage : कधीकधी घरातल्या एखाद्या सदस्याचं लग्न होत नाही. मग अशावेळेस त्या व्यक्तीने वास्तुशास्त्रातले हे काही नियम आजमावण्याचा प्रयत्न करावा.
घरातल्या विवाह उत्सुक मंडळींना आपला विवाह कधी होईल याचे वेध लागलेले असतात. अनेकदा अगदी चटकन ही लग्नगाठ बांधली जाते. मात्र कधीकधी हीच लग्नगाठ बांधायची म्हणजे नाकीनाऊ येतात. अनेकदा अगदी हातातोंडाशी येऊन लग्न व्हायचं काही ना काही कारणांमुळे राहातं. मग अशा मंडळींना वास्तुशास्त्रातले काही सोपे उपाय मदतीला येतात. ते उपाय कोणते आहेत हे आपण पाहाणार आहोत.
share
(1 / 6)
घरातल्या विवाह उत्सुक मंडळींना आपला विवाह कधी होईल याचे वेध लागलेले असतात. अनेकदा अगदी चटकन ही लग्नगाठ बांधली जाते. मात्र कधीकधी हीच लग्नगाठ बांधायची म्हणजे नाकीनाऊ येतात. अनेकदा अगदी हातातोंडाशी येऊन लग्न व्हायचं काही ना काही कारणांमुळे राहातं. मग अशा मंडळींना वास्तुशास्त्रातले काही सोपे उपाय मदतीला येतात. ते उपाय कोणते आहेत हे आपण पाहाणार आहोत.(Freepik)
वास्तुनुसार झोपण्याची पद्धत सर्वात महत्वाची मानली जाते. म्हणजे तुम्ही कोणत्या दिशेला झोपताना आपलं तोंड करता. ज्यांचे विवाह होत नाहीत अशा व्यक्तींनी आपलं डोकं झोपताना उत्तर पूर्व दिशेला ठेवावं. दक्षिण पश्चिम दिशेला डोकं करून झोपू नये.
share
(2 / 6)

बेडशीट्स - विवाह जुळण्यासाठी तुमच्या बेडशीटसच्या रंगांचाही विचार व्हायला हवा. ज्यांचं लग्न होत नाहीये अशा व्यक्तींनी गुलाबी किंवा पिवळ्या अशा हलक्या रंगांच्या बेडशीटस वापराव्यात. असं केल्याने त्याचा फायदा होतो आणि घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
share
(3 / 6)

लोखंड - ज्यांचं लग्न होत नाही अशा व्यक्तींनी पलंगाखाली लोखंडी वस्तू ठेवावी. मात्र त्याच वेळेस घर अत्यंत टापटिप कसं राहील हेही पाहावं. असं केल्याने सकारात्मक उर्जा मिळतेच मात्र त्याचबरोबर देवही प्रसन्न होतात.
share
(4 / 6)

काही लोकांच्या घरात गेल्यास त्यांच्या घरात वरच्या मजल्यावर जायला घराच्या मधोमध पायऱ्या केलेल्या असतात. वास्तुनुसार ज्या व्यक्तींच्या घराच्या मधोमध पायऱ्या असतात त्या व्यक्तींना विवाहाचे योग लवकर येत नाहीत. घराच्या मधोमध असणाऱ्या पायऱ्या नकारात्मक उर्जा निर्माण करतात.
share
(5 / 6)

घरातल्या पडद्यासोबतच घरातल्या भिंतीचा रंगही फिक्कट असावा. फिक्कट रंगाच्या भिंतीही तुमच्या विवाहाला सकारात्मक वातावरण निर्माण करतात. (Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज