मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम ‘शशांक’ अडकला लग्नबंधनात! चेतन वडनेरेने शेअर केले विवाह सोहळ्याचे फोटो

‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम ‘शशांक’ अडकला लग्नबंधनात! चेतन वडनेरेने शेअर केले विवाह सोहळ्याचे फोटो

Apr 22, 2024 05:44 PM IST Harshada Bhirvandekar

Chetan Vadnere Marriage Photos: अभिनेता चेतन वडनेरे यांनी गर्लफ्रेंड ऋतुजा धारप हिच्याबरोबर विवाहगाठ बांधली आहे. 

मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराईचा मौसम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकले आहे. अशातच आता मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक अभिनेता विवाह बंधनात अडकला आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका ‘शशांक’ म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे याचा लग्न सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्याचे काही फोटो आता चेतन त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराईचा मौसम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकले आहे. अशातच आता मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक अभिनेता विवाह बंधनात अडकला आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका ‘शशांक’ म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे याचा लग्न सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्याचे काही फोटो आता चेतन त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.(All Photos: Instagram)

अभिनेता चेतन वडनेरे यांनी गर्लफ्रेंड ऋतुजा धारप हिच्याबरोबर विवाहगाठ बांधली आहे. चेतन आणि ऋतुजा यांनी काही जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत एकमेकांशी लग्नगाठ बांधली. गेल्या काही वर्षांपासून चेतन आणि ऋतुजा दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही आज म्हणजेच २२ एप्रिल २०२४ रोजी एकमेकांचा आयुष्यभराचे साथीदार म्हणून स्वीकार केला.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून, प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोवर कमेंट करत चाहते आणि कलाकार ऋतुजा आणि चेतन या दोघांनाही लग्नाच्या आणि भावी आयुष्यासाठीच्या शुभेच्छा देत आहेत. चेतन आणि ऋतुजा या दोघांनीही त्यांच्या लग्नाचे सुंदर क्षण नुकतेच चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ‘कुर्यात सदा मंगलम’, असं कॅप्शन देत दोघांनीही हे खास क्षण चाहत्यांना दाखवले आहेत. लग्नात चेतन वडनेरे आणि ऋतुजा धारक यांचा पारंपारिक लुक खूपच सुंदर दिसत होता. त्यांच्या या पारंपारिक लुकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

चेतन वडनेरे याची पत्नी ऋतुजा धारप ही देखील अभिनेत्री असून, या दोघांनी फुलपाखरू या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ‘फुलपाखरू’ या मालिकेच्या सेटवरच दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.  त्यांनी लगेचच आपल्या नात्याचा जाहीर खुलासा केला होता.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करायचे. काहीच महिन्यांपूर्वी दोघांनी साखरपुड्याचे फोटो देखील शेअर केले होते. आता अखेर ही जोडी लग्न बंधनात अडकली आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत चेतन वडनेरे याने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेत त्याने साकारलेल्या ‘शशांक’ या पात्राला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील शशांक आणि अपूर्वा यांची जोडी आजही चाहत्यांची आवडती आहे. ही मालिका ऑफएअर गेली असली, तरी प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज