सध्या अनेकजण अयोध्येला जाताना दिसत आहेत. अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचे मंदिर उभारल्यानंतर सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत जवळपास अनेकजण राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. आता मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख पत्नीसोबत या मंदिरात पोहोचला आहे.
रितेश आणि जिनिलियाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतानाचा फोटो शेअर केला आहे.
यावेळी रितेशने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला तर जिनिलियाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.