मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Raksha Bandhan: कोहली-स्मृतीपासून ते पार्थिव पटेलपर्यंत, पाहा क्रिकेटपटूंच्या रक्षाबंधनाचे खास फोटो

Raksha Bandhan: कोहली-स्मृतीपासून ते पार्थिव पटेलपर्यंत, पाहा क्रिकेटपटूंच्या रक्षाबंधनाचे खास फोटो

11 August 2022, 20:10 IST Rohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
11 August 2022, 20:10 IST

Raksha Bandhan: आज संपूर्ण देश रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहे. भाऊ-बहिणीमधले प्रेम दर्शवणारा हा सण टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनीही साजरा केला आहे. तसेच, यानिमित्ताने विराट कोहली, दीपक चहर, स्मृती मानधना, सचिन तेंडुलकर आणि शिखर धवन यांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच राखी बांधतानाचे फोटोही शेअर केले आहेत.

टीम इंडियाचा गब्बर शिखर धवनने आपल्या बहिणीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "बहिण एक गिफ्ट, एक मित्र आणि जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. माझ्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

(1 / 8)

विराट कोहलीने त्याची मोठी बहीण भावना कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. २००६ मध्ये जेव्हा विराटच्या वडिलांचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले तेव्हा त्याच्या बहिणीने त्याची काळजी घेतली. याचा उल्लेख कोहलीने अनेकदा केला आहे. वडील गेल्यानंतर बहीण आणि आईमुळेच विराटचे क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले.

(2 / 8)

दीपक चहरने पत्नी जया आणि बहीण मालती चहरसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मालती अनेकवेळा आयपीएलमध्ये तिच्या भावाला सपोर्ट करताना दिसली आहे. मालती व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे.

(3 / 8)

सचिनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मला माझ्या आयुष्यातील पहिली बॅट देण्यापासून ते नेहमी माझ्या पाठीशी उभी राहण्यापर्यंत, माझी बहीण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे”. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनच्या बहिणीचे नाव सविता असून सचिनने अनेकवेळा आपल्या यशाचे श्रेय सविता यांनाही दिले आहे.

(4 / 8)

नुकतेच बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारी स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने भाऊ आणि वहिनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये ती दोघांना खूप मिस करत असल्याचे सांगत आहे.

(5 / 8)

भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनानेही राखीच्या निमित्ताने बहिणीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो रक्षाबंधन साजरा करताना दिसत आहे. रैनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “रक्षाबंधनाच्या सर्व बंधू-भगिनींना खूप खूप शुभेच्छा. रेणू दीदी, माझी जिवलग मैत्रीण आणि शुभचिंतक होण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला नेहमी प्रेम देण्यासाठी आणि वेळोवेळी समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. तू माझी बहीण आहेस हे माझे सौभाग्य आहे”. 

(6 / 8)

भारताचा माजी विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेलनेही बहीण किंजल पटेलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, " रक्षाबंधनच्या शुभेच्छा. तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनेसाठी धन्यवाद.

(7 / 8)

Raksha Bandhan

(8 / 8)

Raksha Bandhan

इतर गॅलरीज