(1 / 5)अल्लू अर्जनच्या 'पुष्पा २'ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. कदाचित त्यामुळेच इंडस्ट्रीमध्ये या चित्रपटाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, रवीना टंडनचा पती अनिल थडानी यांनी 'पुष्पा २' च्या निर्मात्यांसोबत २०० कोटी रुपयांचा करार केला आहे. आता अशी चर्चा समोर येत आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्मने 'पुष्पा २' चे डिजिटल अधिकार खूप महागड्या किंमतीत विकत घेतले आहेत.