मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  मराठमोळ्या अभिनेत्रीची छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना; पारंपरिक अंदाज ठरला लक्षवेधी!

मराठमोळ्या अभिनेत्रीची छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना; पारंपरिक अंदाज ठरला लक्षवेधी!

Apr 22, 2024 08:44 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Chhatrapati Sambhaji Maharaj Aarti: छत्रपती संभाजी महाराज यांची महती संपूर्ण जगाला माहित आहे. मात्र, त्यांच्यावर कधीच एखादी आरती आलेली पाहायला मिळाली नाही.

चित्रपटांबरोबरच सध्या कलाकार मंडळी गाण्यांच्या माध्यमातून स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र गाण्यांचा ट्रेंड सुरु असलेला पाहायला मिळत आहे. अनेक दर्जेदार गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत असताना अशातच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित 'जय शंभूराया' आरती ही या ट्रेंडिंग गाण्यांमध्ये आलेली पाहायला मिळत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित या आरतीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची महती संपूर्ण जगाला माहित आहे. मात्र, त्यांच्यावर कधीच एखादी आरती आलेली पाहायला मिळाली नाही. अशातच आता 'आनंद म्युझिक' निर्मित 'आनंदी वास्तू' या युट्युब चॅनेलवर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित 'जय शंभुराया' ही आरती प्रदर्शित झाली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या आरतीच्या चित्रीकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लोकप्रिय अभिनेत्री धनश्री कदम या आरती स्वरूपी गाण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहे. धनश्रीने आजवर अनेक चित्रपटांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. आता या पाठोपाठ धनश्रीचं हे नवंकोर आरती स्वरूपातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

छत्रपती संभाजी महाराजांना नमन करत धनश्रीचं नृत्य पाहणं फारच रंजक ठरतंय. यावेळी धनश्रीने परिधान केलेल्या पारंपरिक अंदाजानेही साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. अगदी थाटामाटात या आरतीचं चित्रीकरण पूर्ण झालं. धनश्रीसह या आरती स्वरूपी गाण्यात प्रणव पिंपळकर, आनंद पिंपळकर ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

या गाण्याबद्दल बोलताना धनश्री म्हणाली, ‘छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित यापूर्वी कधीही आरती आली नव्हती. त्यांच्यावर आधारित ही 'जय शंभूराया' आरती पहिल्यांदाच आनंद पिंपळकर घेऊन आले असून, ही आरती 'आनंदी वास्तू' या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे. छत्रपतींच्या या आरतीचा मला भाग होता आलं, यांत मला काम करण्याची संधी मिळाली याहून भाग्याची अशी गोष्ट नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला माहित आहे. आता तो एका वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे.’
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज