G20 Summit: सी-२० परिषदेतील सदस्यांच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये रोषणाई!
C-20 Meeting In Nagpur: सी-२० परिषदेतील सदस्यांच्या स्वागतासाठी नागपूर शहरात ठिकठिकाणी आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे.
(1 / 5)
सी -२० परिषदेच्या आयोजनाची तारिख जवळ येत आहे तसे शहरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. येत्या २० ते २२ मार्च दरम्यान शहरात सी-२० परिषदेचे आयोजन होत आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली
(2 / 5)
विमानतळ ते रहाटेकॉलनी चौक आणि सिव्हिल लाईन्स परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली. तर, कस्तुरचंद पार्क, झिरो माईल्स आदी शहरातील महत्वाची स्थळे रोषणाईने न्हाऊन निघाल्याचे चित्र आहे.
(3 / 5)
रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक फुलझाडे लावण्यात आली आहेत. विविध ठिकाणच्या संरक्षक भिंतींवर सी-२० चे बोधचिन्ह, विविध विषयांवरील आकर्षक चित्रे दिसत आहेत.
(4 / 5)
रस्त्याच्या दुभाजकांवर ग्लो साइन बोर्ड, मेट्रो पीलर दरम्यानच्या छताखाली एलईडी दिव्यांची फुलपाखरे, रस्त्याच्या दुतर्फा डेकोरेटिव्ह पोल लाईट्समुळे झगमगाट दिसून येत आहे.
(5 / 5)
परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी नागपूरमध्ये ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आल्याने शहारात दिवाळी सदृष्य वातावरण निर्माण झाले आहे.
इतर गॅलरीज