IPL 2024 Points Table : रविवारच्या डबल हेडरनंतर गुणतालिकेची स्थिती काय? टॉप ४ संघ कोणते? पाहा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2024 Points Table : रविवारच्या डबल हेडरनंतर गुणतालिकेची स्थिती काय? टॉप ४ संघ कोणते? पाहा

IPL 2024 Points Table : रविवारच्या डबल हेडरनंतर गुणतालिकेची स्थिती काय? टॉप ४ संघ कोणते? पाहा

IPL 2024 Points Table : रविवारच्या डबल हेडरनंतर गुणतालिकेची स्थिती काय? टॉप ४ संघ कोणते? पाहा

Apr 22, 2024 12:41 PM IST
  • twitter
  • twitter
  • IPL 2024 Points Table: आयपीएल २०२४ मध्ये रविवारी (२१ एप्रिल) डबल हेडर म्हणजेच दोन सामने खेळले गेले. कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या सामन्यात आरसीबीचा १ धावांनी पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात गुजरातने पंजाबचा धुव्वा उडवला. या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.
तत्पूर्वी, आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स क्रमांक एकवर आहे. त्यांचे ७ सामन्यात १२ गुण आहेत. 
twitterfacebook
share
(1 / 7)

(ANI )
आयपीएल २०२४ च्या ३६ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीचा केवळ एका धावेने पराभव केला. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद २२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने २० षटकांत सर्वबाद २२१ धावा केल्या. हा सामना जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
twitterfacebook
share
(2 / 7)

कोलकाता नाईट रायडर्स ७ सामन्यांतून १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि त्यांचे गुण समान आहे. पण नेट रन रेटच्या बाबतीत कोलकाताने हैदराबादला मागे टाकले आहे. त्यामुळे केकेआरचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. 
twitterfacebook
share
(3 / 7)

(PTI)
तर आणखी एका पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ ८ सामन्यांतून २ गुणांसह गुणतालिकेत तळाशी आहे. सध्या आरसीबीसाठी आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन करणे खूप कठीण झाले आहे. त्यांना आठपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यांनी ७ सामने गमावले आहेत. 
twitterfacebook
share
(4 / 7)

दुसरीकडे, गुजरात टायटन्सने रविवारी आयपीएलच्या ३७व्या सामन्यात पंजाब किंग्जचा ३ गडी राखून पराभव केला. ८ सामन्यांच्या अखेरीस त्यांनी ८ गुणांची कमाई केली. त्यामुळे ते गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. गुजरात टायटन्सने हा सामना जिंकून मुंबई आणि दिल्लीला मागे टाकले आहे. 
twitterfacebook
share
(5 / 7)

 पराभवानंतर पंजाब किंग्स गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. ८ सामन्यांनंतर त्यांनी ४ गुणांची कमाई केली.
twitterfacebook
share
(6 / 7)

आज सोमवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. या सामन्यानंतरही गुणतालिकेत बरेच बदल होऊ शकतात. पण त्याआधी गुणतालिकेतील अव्वल ५ संघांवर एक नजर टाकूया. १) राजस्थान रॉयल्स - ७ सामन्यांत १२ गुण, २) कोलकाता नाईट रायडर्स - ७ सामन्यांत १० गुण ३) सनरायझर्स हैदराबाद - ७ सामन्यांत १० गुण४) चेन्नई सुपर किंग्ज - ७ सामन्यांत ८ गुण ५) लखनौ सुपर जायंट्स - ७ सामन्यांत ८ गुण
twitterfacebook
share
(7 / 7)

आज सोमवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. या सामन्यानंतरही गुणतालिकेत बरेच बदल होऊ शकतात. पण त्याआधी गुणतालिकेतील अव्वल ५ संघांवर एक नजर टाकूया. 

१) राजस्थान रॉयल्स - ७ सामन्यांत १२ गुण,

 २) कोलकाता नाईट रायडर्स - ७ सामन्यांत १० गुण 

३) सनरायझर्स हैदराबाद - ७ सामन्यांत १० गुण

४) चेन्नई सुपर किंग्ज - ७ सामन्यांत ८ गुण 

५) लखनौ सुपर जायंट्स - ७ सामन्यांत ८ गुण

इतर गॅलरीज