मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Dasara Melava: दसरा सण मोठा, नाही मेळाव्यांना तोटा

Dasara Melava: दसरा सण मोठा, नाही मेळाव्यांना तोटा

Oct 04, 2022 12:34 PM IST Ganesh Pandurang Kadam
  • twitter
  • twitter

  • यंदाचा दसरा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक मेळाव्यांनी गाजणार आहे. मुंबईत शिवसेनेचा व एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा होईल. त्याच शहरात धम्मचक्र परिवर्तन दिनाचा सोहळा होईल. तर, मराठवाड्यात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होईल.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आणि दोन्ही गटांनी आपण शिवसेना असा दावा केल्यानंतर मुंबईत प्रथमच शिवसेनेच्या बॅनरखाली दोन मेळावे होत आहेत. त्यामुळं उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जगातील सर्वात मोठी हिंदुत्ववादी संघटना असलेल्या आरएसएसचा मेळावा प्रतिवर्षीप्रमाणे रेशीम बागेत होणार आहे. तर, पंकजा मुंडे या भगवान गडावर आपल्या समर्थकांना संबोधित करणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

एक पक्ष, एक नेता, एक मैदान… अशी ओळख असलेला शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा प्रथेप्रमाणे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवतीर्थ मैदानावर होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरचा हा पहिलाच मेळावा आहे. या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं जय्यत तयारी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीसाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा असल्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं या मेळाव्याकडं लक्ष लागलं आहे. या मेळाव्यातून ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच भारतीय जनता पक्षालाही लक्ष्य करण्याची शक्यता आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात बंड करून राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन करणारे व मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागलेले एकनाथ शिंदे हे मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेणार आहेत. शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा ठोकला असून बीकेसीवरील मेळावा हाच खरा शिवसेनेचा मेळावा आहे, अशी भूमिका घेतली आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिंदे गटाचे आमदार जोरदार प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाच्या प्रत्येक वक्त्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं जाणार हे निश्चित आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलतात, याबद्दलही उत्सुकता आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात बंड करून राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन करणारे व मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागलेले एकनाथ शिंदे हे मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेणार आहेत. शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा ठोकला असून बीकेसीवरील मेळावा हाच खरा शिवसेनेचा मेळावा आहे, अशी भूमिका घेतली आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिंदे गटाचे आमदार जोरदार प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाच्या प्रत्येक वक्त्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं जाणार हे निश्चित आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलतात, याबद्दलही उत्सुकता आहे. (Hindustan Times)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा प्रतिवर्षीप्रमाणे नागपूर येथील रेशीम बाग मैदानात होईल. सरसंघचालक मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. संघाच्या मेळाव्यातून कुठलंही थेट राजकीय भाष्य केलं जात नाही. मात्र, देशातील सरकारच्या धोरणांबद्दल उहापोह केला जातो. २०१४ पासून देशात संघाचीच राजकीय शाखा असलेल्या भाजपची सत्ता असल्यामुळं विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालक काय बोलतात हे महत्त्वाचं ठरतं. सध्या देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. त्यावर सरसंघचालक सरकारला काही दिशादर्शन करतात, याविषयी उत्सुकता आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भगवानगडावर दसरा मेळावा होणार आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी ही दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. पंकजा मुंडे यांनी ही परंपरा सुरू ठेवली असून त्या दरवर्षी आपल्या समर्थकांना संबोधित करत असतात. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपमध्ये पंकजा यांची राजकीय कोंडी केली जात असल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. गेल्या काही दिवसांपासून ही भावना अधिकच बळावली आहे. अलीकडंच पंकजा यांच्या वक्तव्यावरून वादळ उठलं होतं. त्या पार्श्वभूमीवर पंकजा काय बोलतात, याकडं लक्ष लागलं आहे, 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

दसऱ्या दिवशी होणाऱ्या विविध कार्यक्रमांपैकी नागपूरच्या दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाशी राजकारणाचा संबंध नसतो. या कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दसऱ्याच्या दिवशीच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या दिनाचं औचित्य साधून आंबेडकरांचे अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात. त्यामुळं उद्या दीक्षाभूमी गजबजलेली असेल.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज