Rashi Bhavishya : चतुर्दशीचा सोमवारचा आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल, वाचा राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rashi Bhavishya : चतुर्दशीचा सोमवारचा आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल, वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya : चतुर्दशीचा सोमवारचा आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल, वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya : चतुर्दशीचा सोमवारचा आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल, वाचा राशीभविष्य

Updated Apr 22, 2024 10:54 AM IST
  • twitter
  • twitter
  • Rashi Bhavishya 22 April 2024 : आज २२ एप्रिल २०२४ सोमवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
आज अहोरात्र चंद्र हस्त या शुभ नक्षत्रातून आणि बुध ग्रहाच्या राशीतुन संक्रमण करत आहे. त्याच बरोबर रवि आणि गुरूशी संयोग करीत आहे. बुध वक्री अवस्थेतचं राहणार आहे. गजकेसरीयोगात कसा फलीत होईल आजचा सोमवारचा दिवस! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य! 
twitterfacebook
share
(1 / 13)

आज अहोरात्र चंद्र हस्त या शुभ नक्षत्रातून आणि बुध ग्रहाच्या राशीतुन संक्रमण करत आहे. त्याच बरोबर रवि आणि गुरूशी संयोग करीत आहे. बुध वक्री अवस्थेतचं राहणार आहे. गजकेसरीयोगात कसा फलीत होईल आजचा सोमवारचा दिवस! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य! 

मेषः आज चंद्राशी होणारा गुरूचा संयोग पाहता राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. निरनिराळ्या सूचना कल्पना व्यावसायिक दृष्ट्या आमलात आणा. भाग्यदायक दिनमान राहील.शुभरंगं: तांबूस शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०७, ०९.
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज चंद्राशी होणारा गुरूचा संयोग पाहता राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. निरनिराळ्या सूचना कल्पना व्यावसायिक दृष्ट्या आमलात आणा. भाग्यदायक दिनमान राहील.
शुभरंगं: तांबूस 

शुभदिशाः दक्षिण.
शुभअंकः ०७, ०९.

वृषभः आजचं चंद्रगोचर पाहता व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. दुसरे काय म्हणतात यापेक्षा तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगते याचा विचार करावा. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. परंतु वेळीच सर्व गोष्टी उघड बोलून वातावरण थंड कराल. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याची दक्षता घ्या. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. कामचुकारपणा करू नका. शक्यतो प्रवास टाळा. अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे. शुभरंगः गुलाबी शुभदिशाः आग्नेय.शुभअंकः ०३, ०७.
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभः 

आजचं चंद्रगोचर पाहता व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. दुसरे काय म्हणतात यापेक्षा तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगते याचा विचार करावा. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. परंतु वेळीच सर्व गोष्टी उघड बोलून वातावरण थंड कराल. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याची दक्षता घ्या. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. कामचुकारपणा करू नका. शक्यतो प्रवास टाळा. अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे. 
शुभरंगः गुलाबी 

शुभदिशाः आग्नेय.
शुभअंकः ०३, ०७.

मिथुन: आजच्या चंद्रभ्रमणात कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. जोश पूर्वक कामात रस घ्याल. कुटुंबात समाधान लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील.शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०५, ०८.
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुन: 

आजच्या चंद्रभ्रमणात कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. जोश पूर्वक कामात रस घ्याल. कुटुंबात समाधान लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील.
शुभरंगः हिरवा 

शुभदिशाः उत्तर.
शुभअंकः ०५, ०८.

कर्कः आज चंद्राचा गुरूशी होणारा शुभ संयोग पाहता चांगली फले मिळतील. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. अती संवेदनशील असल्यामुळेच थोडा तापट पणाही वाढेल. तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. व्यवसायात धाडसाची कामे कराल. आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढीस लागेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगती कारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत कला गुणासाठी चांगले वातावरण राहील. संत साहित्य आध्यात्मीक स्वरुपाचे लेखन होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. शुभरंगः पांढरा शुभदिशाः वायव्य.शुभअंकः ०४, ०५.
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्कः 

आज चंद्राचा गुरूशी होणारा शुभ संयोग पाहता चांगली फले मिळतील. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. अती संवेदनशील असल्यामुळेच थोडा तापट पणाही वाढेल. तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. व्यवसायात धाडसाची कामे कराल. आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढीस लागेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगती कारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत कला गुणासाठी चांगले वातावरण राहील. संत साहित्य आध्यात्मीक स्वरुपाचे लेखन होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. 
शुभरंगः पांढरा 

शुभदिशाः वायव्य.
शुभअंकः ०४, ०५.

सिंहः आज अनिष्ट ग्रहमान असल्याने वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. खर्चाचा आकडा थोडा वाढल्यामुळे तसे वाटणे साहजिक असले तरी पैसे मिळणार आहेत. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. आपल्याला मनस्ताप करावा लागेल. व्यवसायिक व्यक्तींनी आज मात्र जपुन पाऊल टाकावी लागणार आहेत. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून रहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साही पणा टाळावा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. साथीदारांच्या कामावर लक्ष असु द्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. पत्नीशी कुटुंबातील इतर सदस्यांसी मनमुटाव होण्याची शक्यता आहे. मनोबल मानसिक स्वास्थ सांभाळा.शुभरंगः लालसर शुभदिशाः पूर्व.शुभअंकः ०१, ०९.
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंहः 

आज अनिष्ट ग्रहमान असल्याने वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. खर्चाचा आकडा थोडा वाढल्यामुळे तसे वाटणे साहजिक असले तरी पैसे मिळणार आहेत. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. आपल्याला मनस्ताप करावा लागेल. व्यवसायिक व्यक्तींनी आज मात्र जपुन पाऊल टाकावी लागणार आहेत. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून रहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साही पणा टाळावा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. साथीदारांच्या कामावर लक्ष असु द्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. पत्नीशी कुटुंबातील इतर सदस्यांसी मनमुटाव होण्याची शक्यता आहे. मनोबल मानसिक स्वास्थ सांभाळा.
शुभरंगः लालसर 

शुभदिशाः पूर्व.
शुभअंकः ०१, ०९.

कन्याः आज चंद्र गोचरात जोडीदाराची काही महत्त्वाची कामे रखडतील. घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे लक्ष द्यावे लागल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागेल. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल. अती संवेदनशील स्वभावा मुळे कधीकधी यांचे नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकरिता अनिष्ट दिवस आहे. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायदयाच्या चौकटीन राहुन कामे करावीत. नियम बाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्‌भवतील. कुटुंबापासुन विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. दुसऱ्यावर अती विश्वास ठेवू नका.शुभरंगः पोपटी शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०३, ०६.
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्याः 

आज चंद्र गोचरात जोडीदाराची काही महत्त्वाची कामे रखडतील. घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे लक्ष द्यावे लागल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागेल. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल. अती संवेदनशील स्वभावा मुळे कधीकधी यांचे नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकरिता अनिष्ट दिवस आहे. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायदयाच्या चौकटीन राहुन कामे करावीत. नियम बाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्‌भवतील. कुटुंबापासुन विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. दुसऱ्यावर अती विश्वास ठेवू नका.
शुभरंगः पोपटी 

शुभदिशाः उत्तर.
शुभअंकः ०३, ०६.

तूळ: आज अनुकूल ग्रहयुतीत सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. अशावेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल.कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. काहींना वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. शुभरंगः भगवा शुभदिशाः पश्चिम.शुभअंकः ०२, ०७.
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज अनुकूल ग्रहयुतीत सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. अशावेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल.कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. काहींना वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. 
शुभरंगः भगवा 

शुभदिशाः पश्चिम.
शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः आज गजकेसरी योगात खरेदी आणि शुभ कामासाठी दिनमान मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. लोकप्रियता समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. या क्षेत्रा मध्येही मोहाचे क्षण तुमची पाठ सोडणार नसल्यामुळे विवेक ठेऊन वेळीच सावध रहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल.शुभरंगः केशरी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०२, ०९.
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज गजकेसरी योगात खरेदी आणि शुभ कामासाठी दिनमान मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. लोकप्रियता समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. या क्षेत्रा मध्येही मोहाचे क्षण तुमची पाठ सोडणार नसल्यामुळे विवेक ठेऊन वेळीच सावध रहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल.
शुभरंगः केशरी 

शुभदिशाः दक्षिण.
शुभअंकः ०२, ०९.

धनुः आज चंद्राशी इतर ग्रहांचा होणारा दृष्टीयोग पाहता धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहिल. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील. व्यापारात साथिदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. शारिरिक कामात वाढ करण्यासाठी प्रयत्न करा. शुभरंगः पिवळसर शुभदिशाः ईशान्य.शुभअंकः ०३, ०७.
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज चंद्राशी इतर ग्रहांचा होणारा दृष्टीयोग पाहता धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहिल. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील. व्यापारात साथिदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. शारिरिक कामात वाढ करण्यासाठी प्रयत्न करा. 
शुभरंगः पिवळसर 

शुभदिशाः ईशान्य.
शुभअंकः ०३, ०७.

मकर: आज चंद्रगोचरात जुनी येणी वसूल होतील. कष्ट खूप करावे लागले तरी यशाचा मार्गही दृष्टीक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. पत्नीकडून सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प कामे पुर्णात्वास जातील. आरोग्य उत्तम राहील.शुभरंगः जांभळा शुभदिशाः पश्चिम.शुभअंकः ०२, ०७.
twitterfacebook
share
(11 / 13)

मकर: 

आज चंद्रगोचरात जुनी येणी वसूल होतील. कष्ट खूप करावे लागले तरी यशाचा मार्गही दृष्टीक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. पत्नीकडून सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प कामे पुर्णात्वास जातील. आरोग्य उत्तम राहील.
शुभरंगः जांभळा 

शुभदिशाः पश्चिम.
शुभअंकः ०२, ०७.

कुंभ: आज अशुभ चंद्रभ्रमणात सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. तुमचा अहंकार कधी दुखावेल हे सागता येत नाही आणि त्यातून कौटुंबिक वातावरणही निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरच होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध रहा. व्यसनी मित्रांपासून दुर रहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यो टाळा. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. घरातील वातावरण बिघणार नाही याकडे लक्ष द्यावे.शुभरंगः निळा शुभदिशाः नैऋत्य.शुभअंकः ०४, ०८.
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभ: 

आज अशुभ चंद्रभ्रमणात सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. तुमचा अहंकार कधी दुखावेल हे सागता येत नाही आणि त्यातून कौटुंबिक वातावरणही निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरच होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध रहा. व्यसनी मित्रांपासून दुर रहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यो टाळा. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. घरातील वातावरण बिघणार नाही याकडे लक्ष द्यावे.
शुभरंगः निळा 

शुभदिशाः नैऋत्य.
शुभअंकः ०४, ०८.

मीनः आज गजकेसरी योगातील चंद्रभ्रमणात समजूतदार आणि सोशिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहून ध्येयाप्रत पोचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहिल. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. व्यापारात नविन योजना आखाल त्या फायदेशीर ठरतील. घरगुती वातावरण चांगले राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.शुभरंग: पिवळसर शुभदिशाः ईशान्य.शुभअंकः ०३, ०५. जय अर्जुन घोडके(jaynews21@gmail.com)(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज गजकेसरी योगातील चंद्रभ्रमणात समजूतदार आणि सोशिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहून ध्येयाप्रत पोचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहिल. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. व्यापारात नविन योजना आखाल त्या फायदेशीर ठरतील. घरगुती वातावरण चांगले राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
शुभरंग: पिवळसर 

शुभदिशाः ईशान्य.
शुभअंकः ०३, ०५.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

इतर गॅलरीज