PHOTOS : उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर अन् कोकणसाठी मोठ्या घोषणा; खेडमधील सभा मुख्यमंत्र्यांनी गाजवली!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर अन् कोकणसाठी मोठ्या घोषणा; खेडमधील सभा मुख्यमंत्र्यांनी गाजवली!

PHOTOS : उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर अन् कोकणसाठी मोठ्या घोषणा; खेडमधील सभा मुख्यमंत्र्यांनी गाजवली!

PHOTOS : उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर अन् कोकणसाठी मोठ्या घोषणा; खेडमधील सभा मुख्यमंत्र्यांनी गाजवली!

Updated Mar 19, 2023 09:14 PM IST
  • twitter
  • twitter
  • Eknath Shinde Khed Rally : कोकणातील कुणबी आणि अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक भवनासाठी चार कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.
Eknath Shinde Rally In Khed Ratnagiri : मी घरात बसणार मुख्यमंत्री नाहीये. दाव्होसला जाऊन महाराष्ट्रासाठी हजारो कोटींची गुंतवणूक आणली. वर्षा बंगल्यात बसून मी राज्याचा कारभार करत नसल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीच्या खेडमधील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंवर तुफान हल्लाबोल केला आहे.
twitterfacebook
share
(1 / 6)

(HT_PRINT)
कोकणच्या मंडणगडमध्ये एमआयडीसीची मागणी करण्यात आलेली आहे. त्याबाबत आमचं सरकार तातडीनं निर्णय घेणार आहे. आमचं सरकार घेणारं नाही तर देणारं सरकार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.
twitterfacebook
share
(2 / 6)

(HT)
कोकणातील तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळावं, यासाठी आम्ही अनेक योजना आणत आहोत. आंबा-काजू प्रक्रिया केंद्रे उभारण्यासाठी १३७५ कोटी रुपयांचा निधी आमच्या सरकारनं मंजूर केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
twitterfacebook
share
(3 / 6)

चक्रीवादळ आणि पूर आल्यानंतर कोकणवासियांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यासाठी आमच्या सरकारनं दोन हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला. मच्छिमार उद्योग, शेती आणि पर्यटनवाढीसाठी आमचं सरकार काम करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.
twitterfacebook
share
(4 / 6)

(Deepak Salvi)
येत्या डिसेंबरपर्यंत कोकणातील रस्त्यांची कामं पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्या पाण्याबाबतही सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
twitterfacebook
share
(5 / 6)

(PTI)
तब्बल ४३ कोटींची खेड नळपाणी योजना आणि मरीन पार्कसाठी आम्ही निधी मंजूर केला आहे. कुणबी आणि अल्पसंख्यांक समाजाच्या भवनासाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडमधील सभेत सांगितलं आहे.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज