chandni chowk bridge demolition : पुणे शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असलेला चांदणी चौकातील पूल आता पाडण्यात आला आहे.
(1 / 5)
chandani chowk pune bridge demolition live : वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरत असलेला चांदणी चौकातील पूल मध्यरात्री स्फोटकांच्या सहाय्यानं पाडण्यात आला आहे.(HT)
(2 / 5)
पूल पाडण्यासाठी स्फोटकांचा वापर करण्यात आल्यानंतरही पूल संपूर्णत: पडलेला नव्हता. त्यानंतर मध्यरात्रीपासून जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्यानं पूल पाडण्याचं काम सुरू होतं.(HT)
(3 / 5)
पूल पाडण्यासाठी २०० मीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. त्यानंतर रात्री ११ वाजता वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.(HT)
(4 / 5)
चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर आता त्यातून १२० डंपर इतका राडारोडा निघणार आहे. त्यामुळं आता प्रशासनानं राडारोडा हटवण्याचं काम मध्यरात्रीपासूनच युद्धपातळीवर सुरू केलेलं आहे.(HT)
(5 / 5)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यानंतर हा पूल पाडून नवा पूल बांधण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता.(HT)