Budh Gochar : बुधाने ३१ मार्च रोजी मेष राशीत प्रवेश केला आहे. १४ एप्रिलला सूर्याचा मेष राशीत प्रवेश झाल्यावर बुधादित्य योग तयार होईल. याचा फायदा अनेक राशींना होणार आहे.
(1 / 7)
३१ मार्च २०२३ रोजी बुध मेष राशीत प्रवेशकर्ता झाला आहे. बुधाचं राशीपरिवर्तन अनेक राशींना फायदेशीर ठरणार आहे. त्यासोबतच बुधाच्या राशीबदलाने बुध आणि राहू यांचीही युती होणार आहे. याचाही काही राशींना फायदा होणार आहे.
(2 / 7)
ज्योतिषशास्त्रानुसार १४ एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. परिणामी मेष राशीत बुधादित्य योग तयार होईल. या नवीन योगाचा परिणाम म्हणून अनेक राशींना फायदा होईल. मेष राशीत प्रवेश करणारा बुध अनेक मोठे बदल घडवून आणणार आहे.
(3 / 7)
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण शुभ असेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ भरभराटीचा राहील. उत्पन्न वाढेल. बचत वाढेल. तुम्हाला संपत्ती मिळेल, मेहनतीचे फळ मिळेल. नातेवाईकांमध्ये मान मिळेल. घरची मंडळीही आनंदात असतील.
(4 / 7)
कर्क- करिअरच्या नव्या वाटा खुल्या होतील. नवा व्यवसाय सुरू करू शकता. भाग्य खुलण्याचा हा काळ आहे. नोकरदारांना अच्छे दिन येतील. प्रेमात यश मिळेल. जमिनीची काही प्रकरणं मार्गी लावू शकाल.
(5 / 7)
सिंह- बुधाचं संक्रमण सिंह राशीच्या लोकांचे भाग्य बदलू शकते. कोणत्याही कार्यात त्यांना मोठे यश मिळू शकते. अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. प्रवासाचे प्रबळ योग आहेत. धार्मिक कार्यात रुची राहील. करिअरमध्ये सुधारणा होईल. प्रतिमा प्रतिकात्मक आहे (सौजन्याने फेसबुक).
(6 / 7)
धनु- बुध हा ग्रहांचा राजकुमार आहे. बुधाचं संक्रमण धनु राशीला फलदायी असणार आहे. विद्यार्थ्यांना यशाचा काळ आहे. प्रेम जीवनात यशस्वी होण्याचा काळ आहे. नात्यात मधुरता राहाण्याचा हा काळ असेल.
(7 / 7)
कुंभ- मीडियाशी संबंधित व्यक्तींना त्यांच्या व्यावसायिक जीवनात नवी दिशा मिळेल. उत्पन्नात वाढ पाहायला मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पगारवाढ आणि पदोन्नची असे दुहेरी योग आहेत.(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)