‘बडे मिया छोटे मिया’ या बॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मंगळवारी मुंबईत मोठ्या थाटात पार पडला. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
(AFP)या ॲक्शन थ्रिलर चित्रपटामध्ये टायगर श्रॉफसोबत अभिनेत्री अलया एफ झळकणार आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट १० एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटातून अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर दुसऱ्यांदा स्क्रिन शेअर करत आहेत. या दोघांनी यापूर्वी 'सम्राट पृथ्वीराज'मध्ये एकत्र काम केले होते.
अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, आलिया आणि टायगर श्रॉफ यांनी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात एकत्र कॅमेऱ्यांसमोर पोज दिली. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा देखील मुख्य भूमिकेत आहे.
या चित्रपटाची कथा दोन भारतीय लष्करी अधिकाऱ्यांभोवती फिरते. या चित्रपटात अक्षय आणि टायगर आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत आहेत. मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.
अक्षय आणि पृथ्वीराज सुकुमारन ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये हस्तांदोलन करताना दिसले. या चित्रपटाची टीम आता एकत्र सगळीकडे प्रमोशन करणार आहे.
‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबई, लंडन, स्कॉटलंड आणि जॉर्डन सारख्या ठिकाणी करण्यात आले आहे.