मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Tokenisation : काय आहे टोकनायझेशन प्रणाली? त्याचा कार्ड पेमेंटवर काय होणार परिणाम

Tokenisation : काय आहे टोकनायझेशन प्रणाली? त्याचा कार्ड पेमेंटवर काय होणार परिणाम

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Sep 20, 2022 02:17 PM IST

Why Tokenisation System, Why Is The System Is Important : कोरोनाच्या काळापासून डिजिटल पेमेंटमध्ये खूप वेगाने वाढ झाली आहे. पण डिजिटल पेमेंटमध्ये फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे आरबीआयची चिंता वाढली आहे. म्हणूनच RBI टोकनायझेशन लागू करत आहे.

काय आहे टोकनायझेशन प्रणाली
काय आहे टोकनायझेशन प्रणाली (हिंदुस्तान टाइम्स)

गेल्या काही वर्षात डिजिटल पेमेंट हा सर्वांच्या आवडीचा विषय झाला आहे. फक्त स्मार्टफोन मोबाईलशी आपलं खातं लिंक केलं की खिशात फारसे पैसे ठेवायची गरज लागत नसल्याने आणि फटाफट समोरच्याच्या बँकेत पैसे पोहोचवणं शक्य होत असल्याने डिजिटल पेमेंट पाहाता पाहाता अगदी हाताचा मळ झाला. करोना काळात याच डिजिटल पेमेंटचं महत्व खूप वाढलं आणि त्याचबरोबर वाढ झाली ती डिजिटल पेमेंटमध्ये होणाऱ्या फसवणुकीची. आता केंद्र सरकारने यावर तोडगा काढण्याचं ठरवलं आहे आणि येत्या १ ऑक्टोबरपासून देशात भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) टोकनायझेशन प्रणाली लागू करत आहे. जाणून घेऊया काय आहे ही टोकनायझेशन प्रणाली?

टोकनायझेशन म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही एखादी वस्तू ऑनलाइन ऑर्डर करता तेव्हा तुम्हाला तुमच्या कार्डचे डिटेल्स द्यावे लागतात. एकदा माहिती शेअर केल्यानंतर, संपूर्ण व्यवहार फक्त OTP द्वारे केला जातो. मात्र टोकनायझेशनचा नियम लागू झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्णपणे बदलेल. या प्रक्रियेत तुमचे कार्ड तपशील कोडमध्ये रूपांतरित केले जातील. या प्रक्रियेला 'टोकनिंग' म्हणतात. म्हणजेच तुमच्या कार्डचा कोणताही नंबर व्यापारी कंपनीसोबत शेअर केला जाणार नाही. डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी हा नियम लागू करण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे.

टोकनायझेशन प्रणाली कशी कार्य करते?

सर्वप्रथम, कोणत्याही व्यापारी कंपनीच्या वेबसाइटवर चेकआउट करताना डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती द्यावी लागेल. यानंतर, ग्राहकाला 'सेक्योर युवर कार्ड' पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, व्यक्तीला त्याच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ई-मेलवर OTP द्वारे टोकनायझेशन प्रणाली अॅक्टिव्ह करावी लागेल. एकदा तुम्हाला टोकन मिळाले की तुम्ही ते कार्डवरील डेटासह बदलू शकता.म्हणजेच आता कंपनीकडे तुमच्या कार्डची माहिती म्हणून एकच कोड असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार, १९५ दशलक्ष लोक आधीच टोकन प्रणाली वापरत आहेत.

याचा कार्ड पेमेंटवर काय परिणाम होईल?

एरवी कोणतीही ऑनलाईन खरेदी करताना आपल्याला आपले कार्ड डिटेल्स तिथे द्यावे लागत होते. आता मात्र ऑनलाईन खरेदी करताना कार्डचे डिटेल्स द्यावे लागणार नाहीत.तुमच्या कार्डाचे तपशील तुम्हाला एका कोडमध्ये मिळतील, ज्याला टोकनिंग असं म्हणतात.यामुळे तुमचा कार्ड नंबर शेअर न होताही तुम्ही पेमेंट करु शकाल. यानं ऑनलाईन फसवणूक थांबेल असा आरबीआयचा विश्वास आहे.

टोकनकरणाची ही प्रणाली आधी १ जुलैपासून लागू होणार होती. मात्र काही कारणांमुळे आरबीआयने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ दिला. मात्र पुन्हा एकदा तारीख वाढवण्याची शक्यता खूपच कमी आहे.

 

IPL_Entry_Point