मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बाजारात आली ‘दारू वेंडिंग मशीन’, ATM मधून पैसे येतात तशी बाहेर येणार दारुची बॉटल, पाहा VIDEO

बाजारात आली ‘दारू वेंडिंग मशीन’, ATM मधून पैसे येतात तशी बाहेर येणार दारुची बॉटल, पाहा VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 22, 2023 05:29 PM IST

Liquor vending machine : चेन्नईमध्ये दारू खरेदी करणे खूपचहायटेक झाले आहे. शहरातीलएका मॉलमध्ये दारू खरेदी करणाऱ्यांसाठी सरकारकडून लीकर वेंडिंग मशीनलावण्यात आली आहे.

Liquor vending machine
Liquor vending machine

देशात मद्यपान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र दारू खरेदी करताना लोकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. मात्र तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये दारू खरेदी करणे खूपच हायटेक झाले आहे. शहरातील एका मॉलमध्ये दारू खरेदी करणाऱ्यांसाठी सरकारकडून लीकर वेंडिंग मशीन लावण्यात आली आहे. आता प्रश्न येतो की, हे मशीन कसे कार्य करणार, तर ATM मशीनमधून जशी रोकड बाहेर येते त्याचप्रमाणे लोक या मशीनमधून दारू खरेदी करू शकणार आहेत.

तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (Tasmac) या कंपनीने चेन्नई येथील एका मॉलमध्ये एलीट स्टोअरमध्ये एक स्वंयचलित दारु वेंडिंग मशीन बसवली आहे. या मशीनवर दारु खरेदीदार पैसे देण्यापूर्वी त्याच्या आवडीची दारु निवडू शकतात आणि मशीनच्या स्क्रीनवर दिसणारी बाटली मधीनमधून प्राप्त करू शकतात. त्यामुळे काउंटरवर दारुसाठी जास्त पैसे घेतले जातात या लोकांच्या तक्रारी कमी होऊ शकतात. या मशीनद्वारे MRP नुसारच दारूची विक्री करण्यात येणार आहे. यामुळे दारू दुकानांसमोर रांगा लावण्याच्या कटकटीतून दारू खरेदीदारांची सुटका होणार आहे.

 

हे मशीद सध्या प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आले आहे. अन्य ठिकाणी मशीन बसवण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. दरम्यान दारू खरेदीसाठी लावण्यात आलेल्या या वेंडिंग मशीनवरून तामिळनाडूतील राजकारण चांगलेच तापले आहे. वेंडिंग मशीनमुळे अल्पवयीन मुलांना दारू विकत घेणे सोपे होईल, असा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. मात्र, मुलांनी त्यांचा वापर करू नये यासाठी व्हेंडिंग मशिनवर सेल्स पर्सन नियुक्त केले जातील, असं राज्य प्रशासनाने सांगितलं आहे.

IPL_Entry_Point